आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा:ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीच्या दोन कसोटींतून ईशांत-रोेहित बाहेर, श्रेयसला मिळू शकते संधी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा, 17 डिसेंबरपासून रंगणार चार कसाेटी सामन्यांची मालिक

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि सलामीवीर रोहित शर्मा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांतून बाहेर झाले. क्रिकइन्फोच्या अहवालनुसार, दोन्ही खेळाडूंच्या अखेरच्या दोन कसोटी खेळवण्यावर देखील संशय आहे. त्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. रोहितला आयपीएलदरम्यान स्नायूची दुखापत झाली होती. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा इशांत दुखापतीमुळे संपूर्ण सत्रात खेळू शकला नव्हता. रोहित वनडे आणि टी-२० संघाचा सदस्य नाही. दोन्ही खेळाडू नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेसवर काम करत आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून अॅडिलेड येथे सुरू होत आहे. इशांतला तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी चार आठवड्यांच्या सरावाची गरज आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागेल. आॅस्ट्रेलियात इशांत १४ दिवस क्वाॅरंटाइन राहील. तो दोन आठवड्यांत सराव सुरू करू शकतो. तो २२ डिसेंबरपूर्वी सराव करू शकणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, “ईशांत संपूर्ण तंदुरुस्त होण्यावर भर देतोय. जर टी-२० सामना असता तर केवळ चार षटके गोलंदाजी करावी लागते. त्यासाठी ईशांत तयार आहे. मात्र, कसोटी सामन्याच्या फिटनेससाठी चार आठवड्यांच्या सरावाची गरज आहे.’

राेहित शर्माच्या पर्यायी खेळाडूच्या भूमिकेसाठी श्रेयस अय्यर चर्चेत

या दाैऱ्यासाठी आता भारताच्या संघ व्यवस्थापनाकडून श्रेयस अय्यरला रोहित शर्माच्या पर्याय म्हणून संधी देऊ शकतो. तो मर्यादित षटकांच्या संघाचा सदस्य आहे. श्रेयसने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांत ५२.८ च्या सरासरीने ४५९२ धावा उभारल्या. यात १२ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा २०१६-१७ मध्ये घरच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत जखमी विराट कोहलीचा पर्याय म्हणून समावेश करण्यात आला होता. श्रेयसला अद्याप कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेली नाही. मात्र, अाता याच पर्यायी खेळाडूच्या भूमिकेतून त्याला या फाॅरमॅटमध्ये पदार्पण करण्याची माेठी संधी मिळण्याची शक्यता अाहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser