आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड Vs भारत:उपकर्णधार रहाणेला बाहेर करण्याची संघाची तयारी, जडेजाचे स्थान धोक्यात

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौथी कसोटी आजपासून दुपारी 3.30 वाजता ओव्हलमध्ये

इंग्लंड व भारत यांच्यात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथी लढत गुरुवारपासून लंडनच्या ओव्हलमध्ये खेळवली जाईल. पहिला सामना बरोबरीत राहिल्यानंतर भारताने दुसरा आणि इंग्लंडने तिसरा सामना आपल्या नावे केला. हा सामना जिंकणारा संघ मालिका गमावणार नाही. ओव्हलवर भारताचा आलेख खराब आहे. या सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापनाला अनेक प्रश्न सोडवावे लागतील. उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसऱ्या कसोटीत त्याने ६१ धावांची खेळी केली होती, मात्र इतर सर्व डावांत तो अपयशी ठरला. त्याला संघाबाहेर केल्यास हनुमा विहारी किंवा सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. या दोघांसह मयंक अग्रवाल व पृथ्वी शाॅ पर्याय आहेत.

लीड्समधील पराभवानंतर रवींद्र जडेजा रुग्णालयात जाणे संघाचा चिंतेचा विषय आहे. मात्र, पहिल्या तीन सामन्यांत त्याने गोलंदाजीत विशेष कामगिरी केली नाही. त्याच्या जागी ऑफस्पिनर आर. अश्विनला मालिकेत प्रथमच संधी दिली जाऊ शकते. अनुभवी ईशांत शर्मादेखील संघासाठी अडचणीचा विषय बनला आहे. राखीव खेळाडूमधील वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघात संधी मिळू शकते. ईशांतच्या जागी कृष्णासह शार्दूल ठाकूर व अनुभवी उमेश यादव पर्याय असतील.

चौथ्या व पाचव्या दिवशी पावसाची शक्यता
इंग्लंडमध्ये सामन्यादरम्यान पाऊस अडचण निर्माण करत आहे. चौथ्या कसोटीतील पहिले तीन दिवस ढगाळ वातावरण असेल, मात्र पावसाची भविष्यवाणी नाही. सामन्यात चौथ्या व अखेरच्या दिवशी पावसाची शक्यता आहे. सामन्याचा अखेरचा दिवस होण्याची शक्यता कमी आहे. येथे झालेल्या गत १० कसोटीमध्ये चार वेळा संघाने डावाने विजय मिळवला.

मोईन इंग्लंडचा उपकर्णधार
उपकर्णधार जोस बटलर या सामन्यात इंग्लंड संघाचा सदस्य नसेल. त्याच्या जागी मोईन अलीला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले. बटलरच्या जागी ओली पोप आणि सॅम करेनच्या जागी क्रिस वोक्सला अंतिम-११ मध्ये स्थान मिळणे निश्चित आहे. अँडरसन किंवा राॅबिन्सनला विश्रांती देऊन संघ मार्क वुडला संधी देऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...