आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल नुकताच दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरला नसल्याने इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला आहे. आता ताे लवकरच जर्मनी येथे या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी संघामध्ये युवा खेळाडू मयंक अग्रवालला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत बीसीसीआयने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. भारतीय संघ आगामी इंग्लंड दौऱ्यामध्ये एका कसोटीसह प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात हाेणार आहे. सुरुवातीला कसोटी सामन्यात हे दोन्ही संघ समोरासमोर असतील. त्यानंतर ७ ते १७ जुलैदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. पुढच्या महिन्यात १ जुलैपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात हाेणार आहे. त्यानंतर वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेसाठी भारतीय संघ गुरुवारी इंग्लंंडमध्ये दाखल झाला. दरम्यान, संघामध्ये कोहलीसह पुजारा, शुभमन गिल, सिराजचा समावेश आहे. या मालिकेसाठी भारताचे खेळाडू आता या ठिकाणी सराव करणार आहेत. मालिका सुरू हाेण्याच्या चार दिवस आधी सराव सामन्यांचेही आयाेजन करण्यात आले आहे. कोच द्रविडसह ऋषभ व श्रेयस अय्यर हे १९ जुलैला विशेष विमानाने इंग्लंडला रवाना हाेणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.