आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला बरे होण्यासाठी 24 आठवडे लागू शकतात. ऑगस्टपासून तो पुन्हा नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तर बुमराह खेळू शकणार नाही. आशिया चषकातही त्याच्या खेळण्यावर शंका आहे.
मात्र, जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत BCCI कडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि तो ऑगस्टपासून गोलंदाजी सुरू करू शकतो.
मुंबई इंडियन्सच्या कोचने न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रियाचा दिला सल्ला
बुमराहची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्कटेल यांनी केली आहे. यापूर्वी डॉ. रोवन यांनी जेम्स पॅटिन्सन, जेहान बेहरेनडॉर्फ आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यावरही उपचार केले आहेत. IPL टीम मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच शेन बाँड यांनी बुमराहला डॉ. रोवन स्कटेल यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. कोच बॉन्ड देखील त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा दुखापतीमुळे त्रस्त होते. त्यांच्यावर क्राइस्ट चर्चमधील त्याच रुग्णालयात उपचार केले.
बुमराह सप्टेंबर महिन्यापासून क्रिकेटपासून दूर
दुखापतीमुळे बुमराहला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संघातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्याला आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. जसप्रीतने हैदराबादमध्ये 25 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
संघ व्यवस्थापनाचे लक्ष विश्वचषकावर
अहवालानुसार बुमराह आता या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पुनरागमन करू शकतो. वृत्तानुसार, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने बुमराहला यावर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात पुनरागमन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.