आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुमराहचे पुनरागमन:जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट; श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेमध्ये खेळणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह आता लवकरच क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीने (एनसीए) त्याला फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. आता त्याचा कमबॅकचा मार्ग माेकळा झाला. यातून ताे आता श्रीलंकेविरुद्ध आगामी वनडे मालिकेत खेळू शकणार आहे. येत्या १० जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. यातून बुमराहला दीर्घ प्रतीक्षेनंतर दमदार पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे ताे सप्टेंबरपासून संघाबाहेर आहे. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला हाेता. याच गंभीर दुखापतीमुळे ताे गतवर्षी टी-२० वि‌श्वचषकातही सहभागी हाेऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...