आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान साैराष्ट्र संघाच्या कर्णधार जयदेव उनाडकतने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी दिल्लीविरुद्ध सामन्यात पदाला साजेशी कामगिरी केली. त्याने पहिल्याच षटकात विकेटची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने पहिल्या डावात ३९ धावा देताना ८ बळी घेतले. त्यामुळे दमछाक झालेल्या दिल्ली संघाला १३३ धावांवर आपला पहिला डाव गुंडाळावा लागला. दिल्ली संघाकडून ऋत्विक शाैकीन (नाबाद ६८) आणि शिवांक वशिष्ठने (३८) एकाकी झंुज देत संघाचा डाव सावरणारी खेळी केली. प्रत्युत्तरात साैराष्ट्र संघाने एका गड्याच्या माेबदल्यात १८४ धावांची खेळी केली. यासह यजमान संघाने ५१ धावांची आघाडी घेतली. संघाकडून हार्विक देसाई (१०४) आणि चिराग (४४) मैदानावर कायम आहेत. तसेच यजमान मध्य प्रदेश संघाने घरच्या मैदानावर विदर्भ संघाविरुद्ध पहिल्या डावात ६ बाद २३४ धावा काढल्या. संघाकडून रजत पाटीदारने (१२१) शतक साजरे केले. विदर्भाकडून ललित यादव आणि यश ठाकूरने प्रत्येकी दाेन बळी घेतले.
तुषारचे ५ बळी; मंुंबईची आघाडी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने मंगळवारी तामिळनाडू संघाविरुद्ध आघाडी घेतली. संघाच्या तुषार देशपांडेने पाच बळी घेतले. त्यामुळे तामिळनाडू संघाला १४४ धावांवर पहिला डाव गुंडाळावा लागला. प्रत्युत्तरात मुंबई संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद १८३ धावा काढल्या. यासह मुंबई संघाला ३९ धावांची आघाडी घेता आली.
महाराष्ट्राच्या गाेलंदाजांची सरस खेळी : अंकितच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाच्या युवा गाेलंदाज प्रदीप दाढे (३/८५), मनाेज इंगळे (२/४०), अक्षय पालकर (२/५४) आणि सत्यजित बच्छावने (२/६१) सरस गाेलंदाजी केली. त्यामुळे आसाम संघाला पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर मंगळवारी ९ बाद २७२ धावा काढता आल्या. संघाकडून अक्षर सेनगुप्ताने नाबाद ६३ आणि स्वरूपमने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. तीन फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले. तसेच सलामीवीर कर्णधार कुणालने २४ आणि सिबसंकरने ३५ धावांचे याेगदान दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.