आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमाचे उल्लंघन:जाेफ्रा आर्चरने चूक कबूल केली, आता त्याला संघाच्या पाठबळाची गरज : स्टाेक्स

मँचेस्टर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायाे सिक्याेर प्राेटाेकाॅलचे उल्लंघन; कसाेटीतून बाहेर

जाेफ्रा आर्चरला आता मानसिक पाठबळाची माेठी गरज आहे. त्यामुळे त्याला आता संघाने पाठबळ द्यावे. त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया यजमान इंग्लंड संघाचा आॅलराउंडर बेन स्टाेक्सने दिली. विंडीजच्या गाेलंदाज जाेफ्रा आर्चरने यजमान इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसाेटी दरम्यान बायाे सिक्याेर प्राेटाेकाॅल नियमाचे उल्लंघन केले हाेते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली. यातूनच ताे दुसऱ्या कसाेटीतून बाहेर झाला आहे. त्याने नियमाचे उल्लंघन केल्याचे कबुल केले आहे. आता ताे मायदेशी परतला आहे. इंग्लंडचे काेच क्रिस सिल्वरवुड यांनीही स्टाेक्सच्या व्यक्तव्याचे समर्थन केले.

पावसाने खेळ थांबला; जाेफ्रा आर्चर तिसरी कसाेटी खेळणार
इंग्लंड व विंडीज यांच्यातील दुसऱ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला पावसाचा फटका बसला. पावसाच्या व्यत्ययामुळे शनिवारी दिवसाचा खेळ सुरू हाेऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ९ बाद ४६९ धावांवर आपला पहिला डाव घाेषित केला. प्रत्युत्तरात विंडीजने पहिल्या डावात १ बाद ३२ धावा काढल्या. आता जाेफ्रा आर्चर तिसऱ्या कसाेटीत खेळू शकेल. त्याला दंड ठाेठावण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...