आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वर्ल्डकप 2022:39 वर्षीय झुलनचे विश्वचषकात 39 बळी; विश्वविक्रमाशी बराेबरी

हॅमिल्टन6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी करिअरमध्ये आयसीसीचा पाचवा विश्वचषक खेळत आहे. तिने याच विश्वचषकात विक्रमाची बरोबरी साधली. ३९ वर्षीय झुलनने विश्वचषकात ३९ बळी घेतले. यासह तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाज लिन फुलस्टनच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली. झुलनने गुरुवारी यजमान न्यूझीलंडविरुद्ध सामन्याच्या ५० व्या षटकात मार्टिनला बाद केले. यासह तिच्या नावे आता विश्वचषकात ३९ बळी पूर्ण झाले आहेत. मात्र, न्यूझीलंड टीमने भारतावर ६२ धावांनी मात केली. २००२ मध्ये पदार्पण करणाऱ्या झुलनच्या नावे महिला वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याची विक्रमी कामगिरी नोंद झाली. तिने १९७ वनडेमध्ये २४८ बळींची नोंद आहे. ती २०० पेक्षा अधिक बळी घेणारी जगात एकमेव महिला गोलंदाज ठरली आहे.

पूजा वस्त्रकारचे चार बळी : भारताकडून पूजा वस्त्रकारने न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम खेळी केली. तिने १० षटकांत ३४ धावा देत चार बळी घेतले. ही तिच्या करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. हरमनप्रीत कौरने १४ वे वनडे अर्धशतक साजरे केले.

न्यूझीलंड महिला संघाचा यंदाच्या सत्रामध्ये भारताविरुद्ध ६ डावांत २५०+ स्कोअर यजमान न्यूझीलंड टीमने आता प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २६० धावा काढल्या. यजमान टीमने दमदार सुरुवात केली. त्यामुळे एमी सेटर्थवेट (७५), एमेलिया केर (५०) यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. सेटर्थवेट आणि एमेलियाने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. यातून न्यूझीलंड टीमला यंदाच्या सत्रात भारतीय महिला संघाविरुद्ध सहा डावांत २५० पेक्षा अधिक धावसंख्येची नोंद करता आली. आता प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाला ४६.४ षटकांत १९८ धावांत आपला गाशा गुंडाळावा लागला. यजमान न्यूझीलंड संघाकडून ताहुहू आणि एमिलियाने धारदार गोलंदाजी केली. या दोघींनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

महिला वनडे वर्ल्डकप; टॉप-5 विकेट टेकर
गोलंदाज संघ बळी
झुलन भारत 39
लिन फुलस्टन ऑस्ट्रेलिया 39
कॅरोल हॉजेस इंग्लंड 37
क्लेयर टेलर इंग्लंड 36
फिट्जपॅट्रिक ऑस्ट्रेलिया 33

बातम्या आणखी आहेत...