आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Jhulan Goswami ODI Career | Jhulan Goswami Retirement Announcement From ODI Cricket, Jhulan Goswami, The Highest Wicket taker In Women's Cricket, Retires, Will Play Her Last Match At The Historic Lord's Stadium On September 24.

महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी 'चकदा एक्सप्रेस'ची निवृत्ती:24 सप्टेंबरला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक स्टेडियमवर खेळणार शेवटचा सामना

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चकदा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या भारताच्या या 39 वर्षीय खेळाडूने 6 जानेवारी 2002 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 20 वर्षांच्या कारकिर्दीत झुलनने 281 सामने खेळले आहेत. तिच्या नावावर 352 विकेट्स आहेत.

झुलन महिला वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तिने 34 विश्वचषक सामन्यात 43 विकेट घेतल्या आहेत. तिने विश्वचषकात दोनदा 4 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

यापूर्वी तिने टी-20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. तिने 2018 मध्ये भारतासाठी शेवटचा T-20 सामना आणि ऑक्टोबर 2021 मध्ये शेवटची कसोटी खेळली.

तिने शेवटचा सामना मार्चमध्ये खेळला होता

झुलनने मार्च महिन्यात टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत ती बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरली होती. त्या सामन्यात झुलनने 19 धावांत 2 बळी घेतले होते.

विश्वचषकाच्या सामन्यातच तिला निरोप देण्याचा बोर्डाचा प्रयत्न होता. मात्र, दुखापतीमुळे ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळू शकली नाही.

झुलन गोस्वामीच्या जीवनावर एक बॉलिवूड चित्रपटही बनत आहे. यात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 2 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सरावासाठी 80 किमी दूर जात असे

पश्चिम बंगालच्या चकडा येथे जन्मलेल्या झुलनने वयाच्या १५ व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी तिची टीम इंडियासाठी निवड झाली. मुलांना घराजवळ खेळू दिले जात नव्हते. त्यामुळे ती 80 किमी दूर सरावाला जात होती

बातम्या आणखी आहेत...