आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs England Cricket Score In Marathi; India Vs England 1st Test Live Cricket Score Update | (IND VS ENG) Today Match Day 2 Latest News And Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND vs ENG चेन्नई टेस्टचा दुसरा दिवस:दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा स्कोर 8 विकेटवर 555 धावा; 2010 नंतर भारतात द्विशतक झळकावणारा रूट पहिला विदेशी फलंदाज

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रूट आणि सिबलीचा विक्रम, चेन्नईत सुरू आहे पहिला कसोटी सामना

भारत आणि इंग्लंडमध्ये चेन्नईमध्ये पहिली कसोटी खेळी सुरू आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 8 विकेट गमावून 555 धावा काढल्या आहेत. डॉम बेस 28 रन आणि चॅक लीच 6 रन काढून नाबाद राहिले. आजचा दिवसही रूटच्या नावे राहिला. तो भारतात गेल्या 10 वर्षांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला विदेशी फलंदाज बनला. त्याने 218 धावा काढल्या.

ऑली पोप 34 धावांवर बाद झाला. अश्विनने त्याला पायचीत केले. पोपने रूटसोबत मिळून पाचव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. तर बेन स्टोक्स 118 चेंडूत 82 धावांवर बाद झाला. शाहबाज नदीमने चेतेश्वर पुजाराच्या हाती त्याला झेलबाद केले. रूट आणि स्टोक्स यांच्या भागीदारीला इंग्लंडला 124 धावा दिल्या आहेत.

मराठीत लाइव्ह स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

रूट आणि सिबली यांनी तिसऱ्या विकेटवर उतरून 200 धावांची पार्टनरशिप केली. 2013 नंतर भारताच्या विरोधात ही सर्वात मोठा पार्टनरशिप स्कोअर आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलने रांची येथे खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅचमध्ये 191 धावांची भागिदारी केली होती. जोनाथन ट्रॉट आणि इयान बेल केवळ याच जोडीने रूट आणि सिबली यांच्यापेक्षा अधिक धावांची पार्टनरशिप केली होती.

ट्रॉट आणि बेल यांनी डिसेंबर 2012 मध्ये चौथ्या विकेटवर उतरून 208 धावांची पार्टनरशिप केली होती. ही रूटची पहिली टेस्ट मॅच होती. सिबलीने टेस्ट करिअरची ही चौथी फिफ्टी लगावली होती. तत्पूर्वी श्रीलंकेच्या विरोधात गॉल टेस्टच्या दुसऱ्या डावात त्याने 56 धावा ठोकल्या होत्या. रूटने टेस्ट करिअरचे 20 वे शतक आता ठोकले आहे.

भारताचा प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.

इंग्लंडचा प्लेइंग-11: डॉमनिक सिबली, रोरी बर्न्स, डेनियल लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डॉम बेस, जॅक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन.

बातम्या आणखी आहेत...