आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Kapil Dev Rare Inning | Marathi News | Kapil Dev 1983 World Cup Performance, Ranveer Singh Deepika Padukone Film Trailer Out

चित्रपटात कपिलची न पाहिलेली खेळी:भारताच्या 5 विकेट पडल्या होत्या, त्यावेळी आंघोळ करत होते कपिल देव; मैदानावर उतरून इतिहास घडवला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

1983 मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. तोच सोनेरी क्षण चित्रपट दिग्दर्शक कबीर रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. याच चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीझ झाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या कधीही न पाहिलेल्या बॅटिंगची झलक दाखवण्यात आली आहे.

कपिल देव यांनी झिम्बाब्वेच्या विरोधात 175 धावा ठोकल्या होत्या. खेळीमुळे भारताने केवळ मॅचच जिंकली असे नाही. प्रत्यक्षात त्यावेळी भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर होता. परंतु, कपिल देव यांच्या बॅटिंगमुळे भारताला पुन्हा स्पर्धेत सामावून घेण्यात आले.

आंघोळ करत होते, झटपट तयार होऊन मैदानावर आले कपिल
1983 च्या क्रिकेट विश्वचषकात झिम्बाब्वेच्या विरोधात भारताकडे करा किंवा मरा अशी परिस्थिती होती. भारताने ही मॅच हारल्यास वर्ल्ड कप तर सोडा सिरीझमधूनच बाहेर पडावे लागले असते. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सुरुवातीलाच एकानंतर एक विकेट पडण्यास सुरुवात झाली.

17 धावांपर्यंत भारताचे 5 फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतरच कपिल देव फलंदाजीसाठी मैदानात उतरले. त्यांनी केवळ 138 चेंडूंमध्ये 175 धावा ठोकल्या. यामध्ये तब्बल 16 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्या काळात कुठल्याही बॅट्समनने केलेला हा बेस्ट परफॉर्मन्स होता. विशेष म्हणजे, भारताच्या 5 विकेट पडल्या तेव्हा कपिल देव शावर घेत होते. अंगावर साबण तसाच होता. कपिल देव यांना हाक मारण्यात आली तेव्हा ते तसेच झटपट तयार होऊन मैदानावर उतरले होते.

हाच क्षण आणि त्यानंतर झालेली बॅटिंग यांची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

या बॅटिंगची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा नाही
कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीची कुठेही व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. त्याचे कारण असे, की त्यावेळी इंग्लंडमध्ये झालेल्या या सामन्याला बीबीसी माध्यम कव्हर करत होते. झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा सामना झाला नेमक्या त्याच दिवशी बीबीसीचे कर्मचारी काम बंद आंदोलनावर होते. कपिल देव यांची बॅटिंग कुणालाच लाइव्ह पाहणे तर सोडाच ऐकता देखील आली नाही. याच रोमहर्षक क्षणांना रुपेरी पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

कपिल म्हणाले- माझ्या टीमची गाथा
कपिल देव यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला. तसेच "माझ्या टीमची गाथा." असे कॅप्शन दिले. या ट्रेलरचे चाहत्यांकडून तोंडभर कौतुक केले जात आहे. चित्रपटात रणवीर आणि दीपिकासह ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...