आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Kapil Dev Says We Do Not Need Money, That's Why 'No Cricket'; Rejected The Proposal Of India Pakistan Match

क्रिकेट:कपिल देव म्हणाले - पैशाची आम्हाला गरज नाही, त्यामुळे ‘नाे क्रिकेट’, भारत-पाक मॅचचा प्रस्ताव फेटाळला 

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • काेराेनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारत-पाक मॅच आयाेजनाचा अख्तरचा प्रस्ताव फेटाळला

काेराेना व्हायरसबाधितांवरील उपचारासाठी अामच्याकडे पैसे अाहेत. त्यामुळे अाम्हाला अार्थिक नड नाही. यातूनच काेणत्याही प्रकारच्या अार्थिक मदतीसाठी भारत-पाक सामन्यांचे अायाेजन करण्यात येऊ नये, अशा शब्दांत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी पाकच्या अख्तरला चांगलेच सुनावले.  महामारीच्या विळख्यात सापडल्याने माेठ्या संख्येत नागरिकांना बाधा झाली अाहे. या सर्वांच्या उपचारासाठी माेठ्या प्रमाणात खर्चाची गरज अाहे. अशासाठी अाता भारत अाणि पाकिस्तान या दाेन्ही संघांचे तीन सामने अायाेजित करण्यात यावेत. यातून जमा झालेल्या पैशाची देणगी काेराेनाग्रस्तांना देण्यात यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गाेलंदाज शाेएब अख्तरने दिला हाेता. मात्र, याला भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी चांगलीच चपराक लावली.

बातम्या आणखी आहेत...