आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेल्या केदार जाधव (२८३) आणि सिद्धेश वीरने (१०६) शानदार शतकी खेळी करत महाराष्ट्र संघाचा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील विजयाचा दावा मजबूत केला. या दाेघांच्या झंझावाती खेळीच्या बळावर महाराष्ट्र संघाने गुरुवारी आसामविरुद्ध ९ बाद ५९४ धावांवर आपला पहिला डाव घाेषित केला. यासह अंकितच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात ३२० धावांची आघाडी घेतली. आता प्रत्युत्तरात आसाम संघाने दिवसअखेर गुरुवारी दुसऱ्या डावात बिनबाद ६५ धावा काढल्या. अद्याप २५५ धावांनी पिछाडीवर असलेल्या आसाम संघाचा सलामीवीर कर्णधार कुणाल (२८) आणि राहुल हजारिका (३४) मैदानावर कायम आहेत. केदार जाधवने तीन वर्षांनंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दमदार पुनरागमन करताना पहिल्या डावात द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने रणजी ट्राॅफीमध्ये आपले शेवटचे शतक २०१८ मध्ये साजरे केले हाेते. ताे २०१९ मधील सत्रामध्ये समाधानकारक खेळी करू शकला नव्हता. आता फाॅर्मात येत त्याने आसाम संघाच्या गाेलंदाजीचा खरपुस समाचार घेतला.
दुसरीकडे मुंबई संघाने आपली आघाडी कायम ठेवली आहे. यातून तामिळनाडू संघाला गुरुवारी मुंबईविरुद्ध सामन्यातील दुसऱ्या डावात ४ बाद ३८० धावा काढल्या. यासह तामिळनाडू संघ आता ४३ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबई संघाकडून तुषार देशपांडे, माेहित अवस्थी, शम्स मुलाणी आणि सिद्धार्थ राऊतने प्रत्येकी एक बळी घेतला. मुंबई संघाने पहिल्या डावात ४८१ धावांची खेळी केली.
आता तामिळनाडू संघाकडू कर्णधार बाबा अपराजित (१०३), प्रदाेष (नाबाद १०७) आणि विजय शंकरने (नाबाद ४३) डाव सावरणारी खेळी केली आहे. बाबा अपराजीतने १५९ चेंंडूंचा सामना करताना ७ चाैकारांसह १०३ धावांची खेळी केली. यासह त्याने मुंबई संघाविरुद्ध आपल्या करिअरमध्ये चाैथे शतक साजरे केले.
केदारचे २१ चाैकार व १२ षटकार केदार जाधवने शानदार फलंदाजी करताना २८३ चेंडूंत २८३ धावांची खेळी केली. त्याने यादरम्यान २१ चाैकार आणि १२ षटकार ठाेकले. यासह त्याला द्विशतक साजरे करता आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.