आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Khurda Of Hong Kong In 38 Runs! Pakistan's Biggest Victory, Tomorrow Match Between India And Pakistan

आशिया चषक:हाँगकाँगचा 38 धावांतच खुर्दा! पाकिस्तानचा सर्वात मोठा विजय, उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार सामना

शारजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानची पुन्हा एकदा टक्कर होणार आहे. हाँगकाँगवरील विजयामुळे पाकिस्तान संघाने सुपर-४ मध्ये स्थान मिळवले असून त्याची टक्कर आता रविवारी भारताशी होणार आहे. पाकिस्तानने हाँगकाँगला १५५ धावांनी हरवले. हा पाकिस्तानचा टी-२० मधील आंतराष्ट्रीय सामन्याच्या दृष्टीने सर्वातमोठा विजय आहे.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २ बाद १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ अवघ्या १०.४ षटकांत ३८ धावा करून गारद झाला. ही यूएईमधील सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. पाकिस्तानी संघाकडे आशिया चषकातील सर्वाेत्तम वेगवान गोलंदाज आहेत. ते त्यांचा मारा प्रचंड वेगवान आणि भेदक आहे. हाँगकाँगच्या फलंदाजांना एवढ्या वेगवान चेंडूंची सवय नाही. त्यामुळे ते याचा सामना करू शकले नाही आणि ३८ धावांत गारद झाले. संघाचा एकही खेळाडू दोन अंकी धावसंख्या गाठू शकला नाही. तर १० धावाही अवांतर मिळाल्या.तथापि, पाकच्या वेगवान गोलंदाजांना ३ तर फिरकीपटूंना ७ बळी मिळाले. मात्र वेगवान गोलंदाजांनी हाँगकाँगची पहिली फळी उद्ध्वस्त केली. तत्पूर्वी पाक कर्णधार बाबर आझम (९) पुन्हा एकदा अपयशी ठरला. रिझवान (७८*) व फखर जमानने (५३)दुसऱ्या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी केली. खुशदिलने २३३.३३ च्या स्ट्राइक रेटने १५ चेंडूंत ५ षटकारांच्या मदतीने ३५* धावा चोपल्या. रिझवान सामनावीर ठरला.

बातम्या आणखी आहेत...