आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आजपासून सुरू होत आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या परफॉर्मन्सने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. कियारानंतर क्रिती सेनननेही परफॉर्म केले.
या स्टेडियममध्ये 8 वाजल्यापासून मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मंदिरा बेदी या सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहेत. थोड्याच वेळात अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका येथे परफॉर्म करताना दिसणार आहेत. कियाराने तिच्याच 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटातील 'बिजली' गाण्यावर डान्स केला.
एपी ढिल्लन यांचेही सादरीकरण
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त हिप-हॉप गायक एपी धिल्लन देखील परफॉर्म करताना दिसणार आहेत. एपीने 'एक्सक्यूज, ब्राउन मुंडे, समर हाय' सारखी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.
फोटोंमध्ये पाहा उद्घाटन सोहळा…
'ये तो बस सुरूवात है' गाणे रिलीज
उद्घाटन समारंभाच्या आधी दुपारी, BCCI सचिव जय शाह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर WPL चे अधिकृत गीत प्रसिद्ध केले. शंकर महादेवन, हर्षदीप कौर आणि नीती मोहन यांच्यासह 6 गायकांनी संपूर्ण गीताचे प्रकाशन केले.
सामना 8 वाजता सुरू होईल
उद्घाटन समारंभानंतर रात्री 8 वाजता मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल. सामना आधी 7:30 वाजता सुरू होणार होता, परंतु आता नाणेफेक 7:30 वाजता होईल आणि सामना 8 वाजता खेळला जाईल. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर गुजरात संघाचे नेतृत्व बेथ मुनी करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.