आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये किरॉन पोलार्डने एक अप्रतिम झेल टिपून सर्वांना आश्चर्यचकित केले. शुक्रवारी पेशावर जाल्मी आणि मुल्तान सुल्तान यांच्यात सामना झाला. मुलतान सुल्तानने पेशावर जाल्मीवर 4 विकेट्सने मात केली. या सामन्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू पोलार्डने अप्रतिम झेल घेतला.
आधी सीमारेषेवर एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला, नंतर आत येऊन घेतला झेल
या सामन्यात पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार मारला असता, पण पोलार्डने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना बाऊंड्री लाईनवर आश्चर्यकारक झेल टिपला.अन्वर अलीच्या चेंडूवर टॉम कोहलर कॅडमोरने एक शॉट खेळला, पोलार्डने तोच शॉट सीमारेषेजवळ झेलत सर्वांना चकित केले.
पोलार्डने प्रथम एका हाताने सीमारेषेवर चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमारेषेवर त्याचा तोल गेला. अशा स्थितीत पोलार्डने चेंडू हवेत फेकला. त्यानंतर सीमारेषेच्या आत येऊन अवघड झेल घेतला. झेल टिपल्यानंतर पोलार्डने उडीपण मारली
मुल्तानने पेशावरचा चार गडी राखून केला पराभव
PSL मध्ये शुक्रवारी रावळपिंडीत पेशावर जाल्मी आणि मुल्तान सुल्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना झाला. पेशावर जाल्मीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 242 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुल्तानने 19.1 षटकांत पाच चेंडू राखून लक्ष्याचा पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रुसोने PSL मधील सर्वात जलद शतक झळकावले. रुसोने 41 चेंडूत शतक पूर्ण केले.
रूसोच्या शतकाला पोलार्डची साथ
242 धावांचा पाठलाग करताना मुल्तान सुल्तानची सुरुवात खराब झाली. शान मसूद 5 धावा करून सलामीला आला आणि कर्णधार मोहम्मद रिझवान 7 धावा करून बाद झाला. यानंतर रिले रुसो आणि किरॉन पोलार्ड यांनी डाव सांभाळला. रुसो आणि पोलार्डमध्ये 43 चेंडूत 99 धावांची भागीदारी झाली. पोलार्डने 25 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी रुसोने 51 चेंडूत 121 धावा केल्या.
टीम डेव्हिड 2 आणि कुशदिल शाह 18 धावा करून बाद झाले. शेवटी अन्वर अलीने 8 चेंडूत 24 आणि उसामा मीरने 3 चेंडूत 11 धावा करत सामना संपवला. संघाने 19.1 षटकात 6 गडी गमावून 244 धावा केल्या. मुल्तानकडून अजमतल्ला उमरझाईने 2 विकेट घेतल्या. त्याचवेळी मुजीब उर रहमान, अर्शद इक्बाल, वहाब रियाझ आणि सॅम अय्युब यांनी 1-1 बळी मिळवला.
गुणतालिकेत मुल्तान तिसऱ्या स्थानावर
या विजयासह मुल्तान 9 सामन्यांनंतर 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी पेशावर 9 सामन्यांनंतर 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. लाहोर कलंदर 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी इस्लामाबाद युनायटेड 12 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.