आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केएल राहुल पत्नी अथियासह घेतले महाकालचे दर्शन:लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले; भस्म आरतीत झाले सहभागी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटर केएल राहुल त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसह रविवारी सकाळी महाकाल मंदिरात पोहोचले. येथे दोघांनी भस्म आरतीत सहभागी होऊन महाकालचे आशीर्वाद घेतले. दोघेही गेल्या महिन्यातच विवाहबंधनात अडकले आहेत.

लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच महाकालाच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. दोघांनीही महाकाल मंदिराच्या नंदी हॉलमध्ये सुमारे २ तास बसून पहाटे होणाऱ्या भस्म आरतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यानंतर गर्भगृहात जाऊन पूजा व अभिषेक केला.

रांगेत उभे राहून घेतले दर्शन

नवविवाहित जोडपे पहाटे चार वाजता मंदिरात पोहोचले, भस्म आरती संपल्यानंतर दोघेही रांगेत उभे राहून गर्भगृहात पोहोचले आणि सुमारे 10 मिनिटे येथे पूजा करून देवाचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान अथिया अगदी साध्या पद्धतीने साडीत दिसली, तर केएल राहुल धोतर आणि उपरणे परिधान करून दर्शनाला आला होता.

मीडियापासून दुर

महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दोघेही आशिष पुजारी आणि संजय पुजारी यांच्या खोलीत पोहोचले, तिथे दोघांनी पुजाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर मीडियाला त्यांच्याशी बोलायचे होते तेव्हा दोघांनीही बोलण्यास नकार दिला.

कसोटी मालिकेसाठी इंदूरला पोहोचले आहे

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी केएल राहुल शनिवारी पत्नी अथियासोबत इंदूरला आला आहे. सामन्यापूर्वी वेळ काढून दोघेही उज्जैनला पोहोचले होते.

टीम इंडियाचे इतर खेळाडूही वेगवेगळ्या फ्लाइटने इंदूरला पोहोचले. चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनाडकट शनिवारी संध्याकाळी इंदूरला आले तर वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, केएस भरत, मोहम्मद सिराज, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि प्रशिक्षक राहुल द्रविड रात्री इंदूरला आले. सध्या भारतीय संघ 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

23 जानेवारीला झाले लग्न

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी 23 जानेवारी रोजी अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न केले. लग्नानंतर सुनील शेट्टीने अथिया आणि केएल राहुलचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि प्रेमाने भरलेली पोस्टही लिहिली.

सुनील शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'योग्य व्यक्तीचा हात प्रेमाने आणि विश्वासाने धरणे नेहमीच योग्य असते. फक्त प्रेम आणि विश्वास कोणत्याही नात्याला बळ देतो. तुम्हा दोन्ही मुलांचे खूप खूप अभिनंदन. देवतांचे तूम्हाला आशीर्वाद मिळो.
सुनील शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'योग्य व्यक्तीचा हात प्रेमाने आणि विश्वासाने धरणे नेहमीच योग्य असते. फक्त प्रेम आणि विश्वास कोणत्याही नात्याला बळ देतो. तुम्हा दोन्ही मुलांचे खूप खूप अभिनंदन. देवतांचे तूम्हाला आशीर्वाद मिळो.

अथिया-राहुल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते

राहुल आणि अथिया जवळपास 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. राहुल भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे, तर अथिया एक अभिनेत्री आहे. दोघांच्या कुटुंबाचे मुळ हे कर्नाटक आहे. अथियाने तिच्या करिअरमध्ये 4 चित्रपट केले आहेत. सलमान खानच्या प्रोडक्शन अंतर्गत बनलेल्या हिरो या चित्रपटातून तिने पदार्पण केले.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीने 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 23 जानेवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर हा विवाह पार पडला.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीने 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 23 जानेवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर हा विवाह पार पडला.

भेटीनंतर सतत संपर्कात होते

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. संवाद सुरू झाला आणि दोघांची मैत्री झाली. एकत्र वेळ घालवताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही रिलेशनशिपमध्ये प्रवेश केला.

हे जोडपे नेहमीच चर्चेत असते, परंतु असे असतानाही त्यांनी आपले नाते गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रिलेशनशिपमध्ये असताना, जवळपास दीड वर्ष ते कधीही एकत्र दिसले नाहीत किंवा त्यांनी कधीही एकत्र फोटो पोस्ट केले नाहीत.