आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Bollywood Update, KL Rahul Athiya To Marry Next Year: Will Tie The Knot In January After T 20 World Cup, Cricketer Himself Informs BCCI

केएल राहुल-अथियाचे पुढील वर्षी लग्न होणार:T-20 वर्ल्डकपनंतर जानेवारीत बांधणार लग्नगाठ, क्रिकेटरची BCCI ला माहिती

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल त्यांच्यात असलेल्या नात्याबद्दल नेहमी चर्चेत आणि बातम्यांमध्ये असतात. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही रोज येत असतात. ANI च्या वृत्तानुसार, BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, केएल राहुल पुढील वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या जून्या मैत्रिणीशी लग्न करणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर होईल लग्न

सूत्रानुसार, केएल राहुलने BCCI ला सांगितले की तो पुढील वर्षी अथियाशी लग्न करणार आहे. T-20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर हे कपल महाराष्ट्रात लग्न करणार आहेत. अथियाच्या कुटुंबीयांनीही हीच गोष्ट सांगितली आहे.

यापूर्वी, रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, राहुल-अथियाचे लग्न खंडाळ्यात सुनील शेट्टीच्या ‘जहान’ या बंगल्यात होणार आहे. हे कपल मागील 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे.

लग्नाचे काही कार्यक्रम या कपल्सच्या घरीही होणार आहेत.

अथिया आणि राहुल मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल येथील संधू पॅलेस नावाच्या इमारतीमध्ये सी-फेंसिंग 4BHK अपार्टमेंटमध्ये सोबत राहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी लग्नाचे आयोजकनीही तयारीसाठी या घराची रेकी केली होती.

रिपोर्टनुसार कपल्सने देखील लग्नाची तयारी सुरू केल्याची चर्चा असून घरात लग्नाचे काही फंक्शन होणार आहेत. असे असले तरी त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही.

केएल राहुलने आशिया कपमधील 4 सामन्यात 70 धावा केल्या आहेत.
केएल राहुलने आशिया कपमधील 4 सामन्यात 70 धावा केल्या आहेत.

आशिया कपमध्ये राहुलचा फ्लॉप शो

केएल राहुल सध्या आशिया कपमध्ये व्यस्त आहे. मात्र, राहुल येथे त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 7 चेंडूंचा सामना केला आणि त्याला केवळ 6 धावा करता आल्या.

दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला पुढे जाऊन मोठे खेळायचे होते, पण चेंडू जाऊन त्याच्या बुटावर आदळला. श्रीलंकेच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि अंपायरने त्याला LBW आऊट दिले. त्याने 4 सामन्यात केवळ 70 धावा केल्या आहेत. त्याचवेळी त्याचा स्ट्राइक रेट 104.47 होता.

IPL मध्ये अथिया तिच्या कुटुंबासह राहुलला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली.
IPL मध्ये अथिया तिच्या कुटुंबासह राहुलला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली.

वेळ मिळाला की लग्नाचे प्लानिंगकरणार- सुनील

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पोहोचलेल्या सुनीलला रिपोर्टरने अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबद्दल विचारले होते. यावर उत्तर देताना सुनील म्हणाला, मला वाटतं, मुलांनी ठरवले तेव्हा लग्न होईल. राहुलचे शेड्युल सध्या खूप व्यस्त आहे.

सध्या आशिया चषक, वर्ल्डकप त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौरा आणि ऑस्ट्रेलिया दौरा आहे. मुलांना मोठा ब्रेक मिळाला की तेव्हा लग्न करता येईल. याचं लग्न एका दिवसात होणे शक्य नाही...

सुनील पुढे म्हणाला- सध्या वडिलांची इच्छा आहे की मुलगी असेल तर तिने लग्न करावे, पण एकदा राहुलला ब्रेक मिळाला. मुलांना ठरवू द्या, कारण तुम्ही जर कॅलेंडर पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की राहूलच्या क्रिकेटचे शेड्यूल किती व्यस्त आहे ते.

त्यात केवळ एक ते दोन दिवसांचा अवधी आहे. इतक्या कमी दिवसांच्या ग्रपमध्ये लग्न होणे अजिबात शक्य नाही. जसे आम्हाला वेळ मिळेल त्यावेळी आम्ही नक्की लग्नाचे नियोजन करू.

बातम्या आणखी आहेत...