आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनी गेमची नॉस्टेलजिक स्टोरी:तुम्हाला माहिती आहे का, आयपीएलची सुरुवात कशी झाली, कोणी मांडली या लीगची कल्पना?

दुबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ललित मोदींची आयपीएलची योजना बीसीसीआयने आणली अमलात, शरद पवारांनी मोदींना 100 कोटींचा धनादेश दिला

इंडियन प्रीमियर लीग म्हणा किंवा इंडियन पैसा लीगने अनेक खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याची व छाप सोडण्याची संधी दिली. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, आयपीएलची सुरुवात कशी झाली? पहिले आयपीएल कमिशनर ललित मोदींची ही संकल्पना म्हटली जाते?{ ललित मोदी अमेरिकेच्या व्यावसायिक क्रीडा लीगप्रमाणे भारतात क्रिकेट सुरु करू इच्छित होते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी जवळून ते पाहिले होते. ललित मोदींनी आपली कंपनी मोदी एंटरटेनमेंट ईएसपीएनसोबत मिळून एक व्हेंचरची सुरुवात केली होती. काळानुसार ललित मोदींनी भारतीय क्रिकेटमध्ये आपली पकड निर्माण करणे सुरू केले होते. पहिले हिमाचल क्रिकेट संघटना त्यानंतर पंजाब क्रिकेट संघटनेशी जोडले. २००५ मध्ये राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयमध्ये उपाध्यक्ष म्हणून प्रवेश केला. त्यांनी शरद पवारांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनण्यासाठी मदत केली. २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकानंतर मोदींनी व्यावसायिक क्रिकेट सुरू करण्याचा निर्णय घेतला. जुलै २००७ मध्ये आयएमजी वर्ल्डचे उपाध्यक्ष अँड्र्यू वाइडब्लडला भेटण्यासाठी ते इंग्लंडला गेले. विम्बल्डन फायनलच्या दिवशी त्यांची भेट झाली. येथे आयपीएलबाबत प्राथमिक चर्चा झाली.

मोदींनी बीसीसीआयला आयपीएलपासून दूर राहण्यास सांगितले :

१० सप्टेंबर २००७ रोजी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदींना १०० कोटींचा धनादेश दिला, ज्यामुळे आयपीएलसाठी खेळाडूंना बोलावले जावे. ते वैयक्तिक कार्यालयातून लीगसाठी काम करतील या अटीवर हा पैसा देण्यात आला. त्यासाठी त्यांना कोणतेही वेतन देण्यात येत नव्हते. त्या बदल्यात त्यानी मंडळाला आयपीएलपासून दूर राहण्यास सांगितले. टी-२० विश्वचषकादरम्यान त्यांनी दिल्लीमध्ये आयपीएल जाहीर केली. या कार्यक्रमात राहुल द्रविड, सौरव गांगुली, स्टीफन फ्लेमिंगसारखी मोठी नावे सहभागी झाली.

जानेवारी २००८ मध्ये फ्रँचायझीसाठी लिलाव

या स्पर्धेसाठी दिल्ली, मुंबई, काेलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर व मोहालीची निवड केली. फ्रँचायझीचा लिलाव २४ जानेवारी २००८ मध्ये सुरू झाला. २० फेब्रुवारी २००८ मध्ये पहिल्यांदा खेळाडूंचा लिलाव झाला. धोनी पहिल्या सत्रातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला चेन्नईने ६ कोटी रुपयांत खरेदी केले. सचिनला मुंबईने, सेहवागला दिल्लीने, गांगुलीला कोलकाताने, लक्ष्मणला हैदराबादने, द्रविडला बंगळुरूने व युवीला पंजाबने आयकॉन खेळाडू बनवले. त्यांना संघातील सर्वात महागड्या खेळाडूंपेक्षा १५ टक्के अधिक पैसा देण्यात आला. पहिले सत्र ४४ दिवस चालले व ५९ सामने झाले. वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करत पहिल्या सत्राचा किताब जिंकला.

दोन वर्षे आयुक्त राहिल्यानंतर मोदी बाजूला झाले :

२००८ ते २०१० पर्यंत ललित मोदी आयपीएलचे आयुक्त राहिले. आयपीएल ब्रॉड बनले होते. यादरम्यान अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांचे नाव आले. २०१० मध्ये दोन संघ चुकीच्या पद्धतीने आणल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांनी मॉरिशसची कंपनी वर्ल्ड स्पोर्ट््सला ४२५ कोटींचे कंत्राट दिले होते. त्यामुळे त्यांना १२५ कोटी रुपयांची लाच मिळाली होती असा आरोप होता. त्याबरोबर पैशाची हेराफेरी केल्याचे मोठे आराेप लागले आणि त्यानंतर बीसीसीआयने चौकशी समिती नेमली