आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup Virat Kohli T20 Century; Rohit Sharma Latest BCCI TV Interview, Kohli Interviewed By Rohit Sharma: 7 Minutes Spoken; He Is Talking To Me In Pure Hindi... Saying This, Virat Looked At Rohit And Started Laughing

रोहित शर्माने घेतली कोहलीची मुलाखत:7 मिनिटे बोलला; हा शुद्ध हिंदीत बोलतोय... असं म्हणत विराट रोहितकडे बघून लागला हसायला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानविरुद्ध दमदार शतकी खेळी खेळल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मुलाखत घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. विराटने रोहितला दिलेल्या मुलाखतीत काय काय म्हटले ते जाणून घेऊया…

विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर रोहितने मुलाखत घेतली
विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर रोहितने मुलाखत घेतली

मुलाखतची सुरूवात ही हिंदीत सुरू होते.

रोहित : विराट तुझे खूप खूप अभिनंदन. संपूर्ण भारत तुझ्या 71 व्या शतकाची वाट पाहत होता. मला वाटते की भारतापेक्षा तूच जास्त वाट पहात होतास. तू खेळलेल्या इनिंगमध्ये खूप काही पाहायला मिळाले. तु चांगले गॅप शोधून चांगले शॉट्स मारले. तर मला तुझ्या या खेळीबद्दल सांग. त्याची सुरुवात कशी झाली आणि यावेळी भावना कशी होती?

विराट- माझ्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच रोहितला हिंदीत प्रश्न विचारताना पाहत आहे.

रोहित- मी हिंदी आणि इंग्रजी मिक्स करून प्रश्न विचारेन असा ठरवलं होतं मात्र हिंदीमध्येच सुर गवसला तर हिंदीमध्येच मुलाखत सुरू ठेवू या. अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या खेळीबद्दल सांग, त्याची सुरुवात कशी केलीस

विराट- खरं तर मला वाटले नव्हते की टी-20 मध्ये शतकाचा दुष्काळ संपेल.दोन-तीन दिवसांपूर्वी कोच राहुल द्रविडशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी असं सांगितले होते की, जर आपण प्रथम फलंदाजी करत असू तर मधल्या षटकांमध्ये स्ट्राइक रेट कसा वाढवता येईल. टीमसाठी मला जे काही करायचे आहे, ते मला या आशिया चषकात प्रयत्न करायला हवे. हेच त्यांचे ध्येय होते. तसेच तू (रोहित) आणि संघ व्यवस्थापनाने दिलेल्या स्पेसमुळे माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.

रोहित: तु सामन्यात गॅप शोधून फटके मारण्या ऐवजी यावेळी तू जास्त शॉटस मारण्याकडे तूझा कल होता, हा तूझ्यात बदल कसा झाला

विराट- खरं तर षटकार मारणे ही माझी स्ट्रेंथ नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी कोच राहुल द्रविडशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी असं सांगितले होते की, जर आपण प्रथम फलंदाजी करत असू तर मधल्या षटकांमध्ये स्ट्राइक रेट कसा वाढवता येईल. टीमसाठी मला जे काही करायचे आहे, ते मला या आशिया कपमध्येच प्रयत्न करायला हवे.

टी-20 मध्ये स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी षटकार मारणे आवश्यक आहे, हे मी माझ्या मनातून काढून टाकले आहे. मोठे षटकार मारणे ही माझी ताकद नाही. परंतू टीमला आवश्यकता असेल तर नक्की तसे करायला हवे. माझे पहिले लक्ष्य हेच असते की खेळाडूंच्या मध्ये गॅप शोधून त्यातून चौकार मारायचे आणि मी अनेकदा तेच केले.

आगामी सिरीजमध्येही मी अशीच खेळी खेळण्याचा माझा प्रयत्न असेल आणि ज्यामुळे मला टी-20 वर्ल्डकप पूर्वी चांगला सुर सापडेल आणि मला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचे योगदान देता येईल. कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 200 होता.

रोहित : राहुलने तुझ्यासोबत फलंदाजी करत चांगली भागीदारी केली, त्याच्या खेळीबद्दल काही सांग?

विराट - वर्ल्डकपपूर्वी राहुल फॉर्ममध्ये येणे ही टीम इंडियासाठी चांगली गोष्ट आहे. त्याच्या फॉर्ममध्ये येण्याने संघ मजबूत होईल. आगामी सिरीजमध्ये राहुलला पुन्हा गती मिळेल अशी आशा आहे.

मला आता माझ्या फलंदाजीत वेगळे काही करायचे नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजमध्ये कठीण परिस्थितीत मला योग्य निर्णय घ्यायचा आहे आणि टीमला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे.

त्यानंतर रोहित म्हणतो की, आम्हा दोघांचे लक्ष आता विश्वचषक आणि आगामी मालिकेवर आहे. फक्त टॉस हा वर्ल्डकपमध्ये मोठा घटक ठरू नये म्हणजे झालं. यासह मुलाखत संपते.

आपणास माहित असेल की...

राहुलने गेल्या सामन्यातही 41 चेंडूत 151 स्ट्राइक रेटने खेळत 62 धावांची खेळी केली होती. यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलला जास्त धावा करता आल्या नाहीत. विराट कोहलीने 71 वे शतक झळकावून रिकी पाँटिंगची बरोबरी केली. किंग कोहलीने तब्बल 3 वर्षांनंतर (1020 दिवस) शतक केले आहे. त्याचे टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमधील हे पहिलेच शतक आहे.

विराटच्या 70 व्या शतकापासून 71 व्या शतकाच्या प्रतीक्षेचा कालावधी हा 72 सामन्यांचा होता. या काळात त्याने 26 अर्धशतके झळकावली. यानंतर त्याचा शतकांचा दुष्काळ संपला. या वाईट टप्प्यात विराट कोहलीला 9 वेळा खातेही उघडता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...