आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Krunal Pandya Coronavirus | India Vs Sri Lanka Coronavirus News; Second T20i Postponed After Krunal Pandya Test Positive For Covid 19; News And Live Updates

भारत Vs श्रीलंका:कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने दुसरा टी-20 सामना स्थगित; इतर सर्व खेळाडू निगेटिव्ह आल्यास उद्या होऊ शकतो सामना

कोलंबो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वांचा अहवाल येईपर्यंत संघ आयसोलेशनमध्ये

भारत आणि श्रीलंका संघादरम्यान टी-20 सामन्याची मालिका सुरु आहे. परंतु, भारतीय संघातील खेळाडू कृणाल पांड्या कोरोनाबाधित झाल्याने दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. हा सामना मंगळवारी 8 वाजेपासून सुरु होणार होता. विशेष म्हणजे भारतीय संघातील इतर सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह आल्यास हा सामना बुधवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वांचा अहवाल येईपर्यंत संघ आयसोलेशनमध्ये
कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही संघाना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत सर्व खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह येत तोपर्यंत दोन्ही संघाना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

1-0 पुढे भारतीय संघ
भारतीय संघाने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती. त्यानंतर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 38 धावांनी पराभूत करत जोरदार विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघ टी-20 मालिकेत 1-0 ने पुढे आहे.

बातम्या आणखी आहेत...