आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Krunal Pandya Deepak Hudda Ipl 2022 Mega Auction Now They Will Be Sitting Together In A Lucknow Dugout | Marathi News

IPL मधील वाद:हुड्डाला क्रुणालने केली होती शिवीगाळ, रागाच्या भरात दीपक टीम सोडून गेला होता; आता दोघेही लखनऊच्या डगआऊटमध्ये एकत्र बसणार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी झालेल्या आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना विश्वास बसणार नाही असे काही घडले. क्रिकेटविश्वातील दोन मोठ्या विरोधी जोड्या आता एकाच संघात एकत्र असतील. क्रुणाल पांड्या-दीपक हुड्डा लखनऊकडून खेळताना दिसणार आहेत. याव्यतिरिक्त रविचंद्रन अश्विन-जोस बटलर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहेत. या खेळाडूंमधील शत्रुत्वाची कथा काय आहे ते जाणून घ्या...

दीपक हुडाला क्रुणाल पांड्याने शिवीगाळ केली होती
दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये वडोदराकडून खेळायचे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान उत्तराखंड विरुद्ध सामना होणार होता. त्यावेळी संघाचा उपकर्णधार दीपक हुड्डा आणि कर्णधार क्रुणाल पांड्या होता. हे दोघे एकमेकांशी भिडले. भांडण इतके वाढले होते की, दीपक सराव सोडून घरी गेला होता. यानंतर त्याने वडोदरा क्रिकेट असोसिएशनकडे (BCA) तक्रारही केली होती. क्रुणाल प्रत्येक गोष्टीत त्याला शिवीगाळ करतो असे त्याने म्हटले होते.

दोघांमध्ये यावरून वाद झाला होता की, टीमने कॅच किंवा बॅटिंगपैकी कशाची प्रॅक्टिस करावी.

हॉटेलमध्ये गेलो तेव्हा संघात माझे नाव नव्हते
वादानंतर दीपक म्हणाला होता, 'जेव्हा मी फलंदाजीचा सराव करायला गेलो तेव्हा क्रुणालने मला कॅचचा सराव करण्यास सांगितले. मी म्हणालो की मला फलंदाजीच्या सरावासाठी प्रशिक्षकाकडून मंजुरी मिळाली आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दीपकच्या म्हणण्यानुसार, क्रुणाल म्हणाला होता की, मी बघेन तू वडोदरासाठी कसा खेळतोस? हॉटेलमध्ये गेल्यावर माझे नाव संघात नव्हते, म्हणून मी घरी गेलो.'

त्यानंतर दीपकनेही वडोदरा संघ सोडला. त्याचवेळी क्रुणाल पांड्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. आता हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत. दोघेही लखनऊ संघाचा भाग असतील. दीपकला लखनऊने 5 कोटी 75 लाखांना विकत घेतले आहे. त्याचवेळी या संघाने 8 कोटी 25 लाखांमध्ये कृणाल पांड्याला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.

अश्विन-बटलरही एकाच संघामध्ये
2019 च्या आयपीएल हंगामात रविचंद्रन अश्विन आणि जोस बटलर, जे मंकडिंग वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते ते देखील एकाच संघाकडून खेळतील. एवढ्या मोठ्या वादानंतर दोघेही एकाच संघात दिसू शकतील याची कल्पना आयपीएल चाहत्यांनी कधीच केली नसेल, पण शनिवारी अश्विनला राजस्थान रॉयल्सने विकत घेतल्यावर ते खरे ठरले. जोस बटलरला राजस्थान संघाने आधीच कायम ठेवले आहे.

आता दोन्ही स्टार खेळाडू आयपीएल 2022 मध्ये सहभागी होणार आहेत आणि तेही एकाच संघात. अश्विनच्या राजस्थान संघात समावेश करण्याबाबत फ्रेंचायझीने आधीच जोस बटलरशी चर्चा केली होती. यात आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचे बटलरने म्हटले होते. अश्विनची सॅलरी पूर्वी दिल्लीत ७ कोटी ६० लाख होती. 2022 च्या मेगा लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने 5 कोटींमध्ये विकत घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...