आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Lakshya Sen In Pre quarter Finals, Hosts Defeat In 3 Games, Match Lasted One Hour And Two Minutes | Marathi News

कोरिया ओपन:लक्ष्य सेन प्री-क्वार्टर फायनलमध्ये, 3 गेममध्ये यजमानांचा पराभव, एक तास दोन मिनिटे चालला सामना

सुनिचयोन (दक्षिण कोरिया)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंग्लंडचा रौप्यपदक विजेता लक्ष्य सेन कोरिया ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सहाव्या मानांकित लक्ष्यने यजमान दक्षिण कोरियाच्या जू जी हूनचा १४-२१, २१-१६, २१-१८ ने पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना एक तास दोन मिनिटे चालला. हा लक्ष्य व झू जी यांच्यातील पहिलाच सामना होता. आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्यचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूशी होईल. त्याचबरोबर, महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मालविका बनसोडने चीनच्या हान यू हिचा २०-२२, २२-२०, २१-१० असा पराभव केला. आता मालविकाचा सामना थायलंडच्या खेळाडूशी होणार आहे. दुसरीकडे, एचएस प्रणयला पहिल्या फेरीत सलग गेममध्ये पराभूत व्हावे लागले.

बातम्या आणखी आहेत...