आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Lara Replaced Muddy As Coach Of Sunrisers Hyderabad; He Will Play The Role Of A Coach For The First Time | Marathi News

नियुक्त:मुडीला हटवून लारा बनले सनरायझर्स हैदराबादचे कोच ; पहिल्यांदाच प्रशिक्षकाची भुमिका निभावणार ​​​​​​​

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू ब्रायन लारा यांना सनरायझर्स हैदराबादने नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी या आयपीएल संघाचे प्रशिक्षक होते. ५३ वर्षीय लारा पहिल्यांदाच एखाद्या टी-२० संघाचे प्रमुख प्रशिक्षक बनले आहेत. वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार लारा यांना मागील वर्षी डिसेंबरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा धोरणात्मक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. २०१३ ते २०१९ पर्यंत मुडींच्या कार्यकाळात हैदराबादची कामगिरी खूप सरस ठरली होती. संघ पाच वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला होता, तर २०१६ मध्ये चॅम्पियनही ठरला होता. मुडींना २०२० मध्ये ऑस्ट्रेलियातीलच ट्रेवर बेलिसने प्रशिक्षकपदावरून हटवले होते. परंतु मागील वर्षी ते क्रिकेट डायरेक्टर हैदराबादशी जोडले गेले. तथापि संघाने मागील हंगामात केवळ तीन सामने जिंकले होते.

बातम्या आणखी आहेत...