आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना:6 वर्षांनंतर T-20 मध्ये दोन्ही संघ भिडणार, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मेलबर्नएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेला भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही उपांत्य फेरी गाठण्याची शेवटची संधी आहे. भारताचा गटातील शेवटचा सामना झिम्बाब्वे टीमशी हाेणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे संघ रविवारी समाेरासमाेर असणार आहेत. भारताला या सामन्यातील विजयाने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करता येणार आहे. सध्या भारतीय संघ चार सामन्यांमध्ये तीन विजयाने ६ गुणांसह ब गटात अव्वल स्थानावर आहे. संघाच्या नावे ०.७३० नेट रनरेटची नाेंद आहे.

दुसरीकडे झिम्बाब्वे संघ तीन गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या संघाचा नेट रनरेट -०.३१३ असा आहे. त्यामुळे भारताचे विजयाचे पारडे जड मानले जाते. या दाेन्ही संघांमध्ये टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच सामना हाेत आहे. या दाेन्ही संघांमध्ये आेव्हरऑल टी-२० चे सात सामने झाले आहेत. यादरम्यान भारताने पाच सामन्यांत विजय संपादन केले आहेत. यातून भारताच्या नावे या संघाविरुद्ध ७२ टक्के विजय नाेंद आहेत. झिम्बाब्वेने १८ जून २०१६ राेजी भारतावर शेवटचा विजय संपादन केला.

पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका संघ विजयासाठी उत्सुक गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला रविवारी अॅडिलेडच्या आेव्हल मैदानावर विजय साजरा करण्याची संधी आहे. आफ्रिकेचा गटातील शेवटचा सामना हाॅलंड टीमशी हाेणार आहे. हे दाेन्ही संघ पहाटे ५.३० वाजेपासून या मैदानावर समाेरासमाेर असतील. दक्षिण आफ्रिका संघ ५ गुण आणि १.४४१ नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना हाेणार आहे. पाकला या सामन्यात विजयासाठी माेठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. पाक संघाच्या नावे ४ गुणांसह १.११७ नेट रनरेटची नाेंद आहे. यासह हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...