आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Lata Mangeshkar Passes Away The 1983 World Cup Winning Team Got The Prize Money, So Lata Had Raised 20 Lakh Rupees By Doing A Program | Marathi News

लतादीदींचे क्रिकेटवर विशेष प्रेम:1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाला बक्षिसाची रक्कम देण्यासाठी स्टेडियममध्ये कार्यक्रम करून 20 लाखांचा निधी उभा केला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत, पण त्यांचा एक उपकार क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील. भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयकडे त्यावेळी बक्षीस देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यानंतर लताजींनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम जमा केली होती. एवढेच नाही तर या की इव्हेन्टसाठी त्यांनी बीसीसीआयकडून एक पैसाही घेतला नाही.

1983 चा विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाला बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे पुरस्कार देऊ इच्छित होते, पण पैशाअभावी ते जमले नाही. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी साळवे यांनी स्वरकोकीळा लता मंगेशकर यांना मदत मागितली. भारतीय संघाचा विजय साजरा करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये लता मंगेशकर कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. ही मैफल प्रचंड गाजली आणि 20 लाख रुपये जमा झाले. नंतर भारतीय संघातील सर्व सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

या कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली, परंतु 'भारत विश्व विजेता' या गाण्याला खूप दाद मिळाली. या गाण्याचे संगीत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले होते, तर त्याचे बोल सुप्रसिद्ध बॉलिवूड गीतकार 'इंदीवर' यांनी लिहिले होते. विशेष म्हणजे जेव्हा लता मंगेशकर स्टेजवर हे गाणे म्हणत होत्या, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही मागून लताजींच्या आवाजात त्यांचे सूर मिसळत होते.

बातम्या आणखी आहेत...