आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत वर्षी ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. यासह टीमला खाली हाताने मायदेशी परतावे लागले. मात्र, आता भारतीय संघ घरच्या मैदानावर हाेणाऱ्या वनडेच्या विश्वचषकावर नाव काेरण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी यजमान भारतीय संघाने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून या माेहिमेला सुरुवात केली. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधार राेहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणसाेबत खास माेहीम हाती घेतली आहे. या तिघांच्या उपस्थितीमध्ये बीसीसीआयने टी-२० विश्वचषकातील कामगिरीचा लेखाजाेखा घेतला. आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघातील २० खेळाडूंची शाॅर्ट लिस्ट तयार केली. याच २० जणांमधून वनडे विश्वचषकासाठीचा भारतीय संघ निवडला जाणार आहे. आता विश्वचषकापर्यंतच्या वनडे सामन्यादरम्यान खेळाडूंच्या खेळीवर निवड समितीचे लक्ष असणार आहे.
बैठकीत गाजला वर्कलाेड, दुखापतीचा मुद्दा बीसीसीआयच्या वतीने आयाेजित बैठकीमध्ये खेळाडूंच्या वाढत्या वर्कलाेड आणि जायबंदीच्या प्रकरणावर सखाेल चर्चा झाली. यातून हे दाेन्ही धाेके दूर करण्यासाठी खास उपाययाेजना करण्याचाही निर्णय घेण्यात आला. दुखापतीचा धाेका टाळण्यासाठी आता बीसीसीआय याे-याे टेस्टसाेबतच खेळाडूंची डेक्सा टेस्टही करणार आहे. दहा मिनिटांच्या या चाचणीतून खेळाडूंच्या फिटनेस आणि दुखापतीची परिपूर्ण माहिती समाेर येणार आहे. युवा खेळाडूंसाठी ही टेस्ट महत्त्वाची मानली जाते. त्यावर आता निर्णय घेतला जाईल.
८ मिनिट ३० सेकंदांत २ किमी धावण्याचे टार्गेट; याे-याेसाेबतच आता डेक्सा टेस्टही भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतीमध्ये माेठी वाढ हाेत आहे. यासाठी याे-याे टेस्ट घेतली जाते. याच्या माध्यमातून खेळाडूंना आपला फिटनेस सिद्ध करता येताे. या चाचणीदरम्यान खेळाडूंना २५ मीटर वेगवेगळ्या वेगाने धावत तंदुरुस्त असल्याचे सिद्ध करावे लागते. याशिवाय ही टेस्ट न देणाऱ्यांसाठीही आता बीसीसीआयने वेगळा फाॅर्म्युला तयार केला. यासाठी खेळाडूंसमाेर आता ८ मिनिट ३० सेकंदांमध्ये २ किमीचे अंतर गाठण्याचे टार्गेट असेल. यात यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंचा फिटनेस चांगला असल्याचे समाेर येईल. त्यामुळे आता भारतीय संघातील खेळाडूंना याे-याेसाेबतच डेक्सा टेस्टही द्यावी लागणार आहे.
भारतीय संघातील आठ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर खेळाडू दुखापत रोहित शर्मा फलंदाज अंगठा जसप्रीत बुमराह गाेलंदाज पाठ रवींद्र जडेजा ऑलराउंडर घुटना प्रसिध कृष्णा गाेलंदाज पीठ खेळाडू दुखापत दीपक चाहर गाेलंदाज हॅमस्ट्रिंग ऋषभ पंत यष्टीरक्षक अपघात नवदीप सैनी गाेलंदाज मांसपेशी शमी गाेलंदाज खांदा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.