आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Kinchit Shah Proposes To His Girlfriend | IND VS HK Dubai Stadium Video, Little Shah Proposes Marriage To Pryesi, Wears Diamond Ring On Knee In Stadium Balcony After India Hong Kong Match

किंचित शाहची प्रेयसीला लग्नाची मागणी:भारत-हॉंगकॉंग सामन्यानंतर स्टेडियमच्या बाल्कनीत गुडघ्यावर बसून घातली डायमंड रिंग

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँगचा उपकर्णधार किंचित शाह आणि त्याच्या मैत्रिणीसाठी गुरुवारचा दिवस खूप खास ठरला. याच दिवशी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

भारत-हाँगकाँग सामन्यानंतर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या बाल्कनीत किंचित शाहने आपल्या मैत्रिणीला सरप्राईज देत तिला लग्नासाठी मागणी घातली. हे पाहून त्याच्या मैत्रिणीला सुरूवातीला तर धक्काच बसला पण या सरप्राईजने तिलाही खूप आनंद झाला आणि त्यानंतर तिने लगेच होकार दिला.

इतकंच नाही तर स्टेडियममध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर हा क्षण दाखवला गेला तेव्हा चाहत्यांनी जल्लोष करून त्यांच्या प्रेमाला प्रोत्साहन देत दोघांचाही उत्साह वाढवला.

दीपक चहर आणि जया भारद्वाज यांचे जून महिन्यात लग्न झाले
दीपक चहर आणि जया भारद्वाज यांचे जून महिन्यात लग्न झाले

आपल्याला आठवत असेल की IPL च्या खेळांमध्ये CSK चा वेगवान गोलंदाज दीपक चहरने देखील त्याची प्रेयसी जया भारद्वाजला अशाच प्रकारे लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर याच वर्षी जून महिन्यात या दोघांचे लग्न झाले.

किंचितचा जन्म मुंबईतला, वडील आहेत हाँगकाँगमध्ये हिऱ्याचे व्यापारी

आशिया 2018 मध्ये किंचितने 9 षटकांत 39 धावा देत 3 बळी घेतले
आशिया 2018 मध्ये किंचितने 9 षटकांत 39 धावा देत 3 बळी घेतले

हाँगकाँगचा उपकर्णधार किंचित शाहचा जन्म मुंबईत झाला आहे. त्याचे वडील देवांग शहा हे हिऱ्याचे व्यापारी आहेत. किंचित हा ज्यावेळी 3 वर्षाचा होता तेव्हा त्याचे कुटुंब हे हाँगकाँगला शिफ्ट झाले होते.

किंचित हा केवळ छंद म्हणून क्रिकेट खेळतो. तो हाँगकाँगमध्ये एक क्रिकेट क्लबही चालवतो आणि त्याने हाँगकाँगच्या T-20 ब्लिट्झ स्पर्धेतही एक संघ खरेदी केला आहे.

सामना हरला पण प्रेयसीचे जिंकले मन

किंचितला भुवनेश्वर कुमारने रवी बिश्नोईच्या हाती झेलबाद केले
किंचितला भुवनेश्वर कुमारने रवी बिश्नोईच्या हाती झेलबाद केले

किंचितच्या संघाने भलेही हा सामना 40 धावांनी हरला असेल, मात्र किंचितने आपल्या प्रेयसीचे मन नक्कीच जिंकले आहे. त्याने या सामन्यात 28 चेंडूत 30 धावा काढल्या आहेत. आपल्या 50 मिनिटांच्या खेळीत किंचितने दोन चौकार आणि एक सिक्सर खेचले.

2018 च्या आशिया चषकात, भारत-हाँगकाँग सामन्यात किंचितने चांगली गोलंदाजी केली होती त्यात त्याने 9 षटकांत 39 धावा देत 3 बळी घेतले. तरीही हाँगकाँगचा या सामन्यात 26 धावांनी पराभव झाला होता.

क्रिकेटसोबतच तो आपला व्यवसायही सांभाळतो.

क्रिकेट खेळण्यासोबतच तो व्यवसायात वडिलांचीही मदत करतो. ते अनेक देशांमध्ये हिऱ्यांचा व्यापार करतात.

बातम्या आणखी आहेत...