आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली:बांगलादेशविरुद्ध मालिकेत 1-0ने आघाडी, अक्षरने 4 तर कुलदीपने घेतल्या 3 विकेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 188 धावांनी जिंकला. 2 सामन्यांच्या मालिकेत संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने बांगलादेशविरुद्धची सलग चौथी कसोटी जिंकली आहे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध आजपर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. कुलदीप यादव सामनावीर ठरला. त्याने दोन्ही डावात 40 धावा करत आठ विकेट्स घेतल्या.

रविवारी भारताने 513 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव 324 धावांत गुंडाळला. यजमान संघाकडून कर्णधार शाकिब अल हसनने सर्वाधिक 84 धावा केल्या. तो आऊट होताच टीम ऑलआऊट झाली. शाकिब (84) आपले 30 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बाद झाला.

शेवटच्या दिवशी मोहम्मद सिराजने मेहदी हसन मिराजला उमेश यादवकडे झेलबाद करून दिवसातील पहिले यश मिळवले. त्यानंतर अर्धशतक झळकावणाऱ्या बांगलादेशी कर्णधाराला कुलदीपने बाद केले. याच षटकात कुलदीपने इबादत हुसेनलाही शून्यावर बाद केले. अक्षर पटेलने शेवटची उरलेली विकेट घेतली. त्याने तैजुल इस्लामला बोल्ड केले.

भारताकडून अक्षर पटेलने चार आणि कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी 1-1 विकेट घेतली.

अशा पडल्या बांगलादेशच्या विकेट
पहिली विकेट
: शांतो 47 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. उमेशच्या चेंडूवर कोहलीने झेल सोडल्यानंतर पंतने दुसऱ्या प्रयत्नात अप्रतिम झेल घेतला.
दुसरी विकेट : अक्षर पटेलने 50व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यासिर अलीला बोल्ड केले. यासिरला केवळ 5 धावा करता आल्या.
तिसरी विकेट : 69व्या षटकात कुलदीप यादवने लिटन दास (19)ला उमेश यादवकडे झेलबाद केले.
चौथी विकेट : झाकीर हसनला 79 व्या षटकात अश्विनने कोहलीद्वारे झेलबाद केले. या सामन्यात अश्विनला पहिली विकेट मिळाली.
पाचवी विकेट : अक्षरने 88व्या षटकात मुशफिकर रहीमला (23) बोल्ड केले.
सहावी विकेट : रहीमनंतर अक्षरने नुरुल हसनला ऋषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद केले.
सातवी विकेट : 105 व्या षटकात सिराजने मेहदी हसन मिराज (13 धावा)ला उमेशकडे झेलबाद केले. मिराजला ऑफ स्टंपजवळचा लेन्थ बॉल खेळायचा होता. पण, पॉईंटकडे झेलबाद झाला.
आठवी विकेट : 111व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार शकीब अल हसनला कुलदीप यादवने क्लीन बोल्ड केले.
नववी विकेट : इबादत हुसेनला कुलदीपने श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले.
दहावी विकेट : अक्षरने तैजुल इस्लामला बोल्ड केले.

बातम्या आणखी आहेत...