आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन-4:प्रवासी निर्बंध आणि पावसाळ्यामुळे 4 महिन्यांपर्यंत आयपीएल होण्याची शक्यता कमी; टी-20 वर्ल्डकप रद्द झाल्यास ऑक्टोबरमध्ये होऊ शकते स्पर्धा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार स्टेडियम व क्रीडा संकुल उघडण्यास मंजुरी
  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 मे पर्यंत निर्बंध, त्यामुळे आयपीएलसारख्या स्पर्धा होणार नाहीत

गृह मंत्रालयाने रविवारी रात्री लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यासाठीची गाइडलाइन जारी केली. यामध्ये स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उघडण्याची परवानगी तर दिली, परंतु देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर किमान 31 मे पर्यंत बंदी कायम ठेवली आहे. अशात भारतीय आणि विदेशी खेळाडूंना प्रवास करता येणार नाही. यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पुढील चार महिन्यांपर्यंत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

बीसीसीआयनेही एक निवेदन जारी करत म्हटले की, केंद्र सरकारने हवाई प्रवासावरील निर्बंध 31 मेपर्यंत कायम ठेवले आहेत. अशा परिस्थितीत बोर्ड खेळाडूंना प्रशिक्षण किंवा स्पर्धा सुरू करण्याची घाई करणार नाही.

आम्ही प्रशिक्षण सुरू करणार नाहीः बीसीसीआय

मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले की, "आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. कोरोनाशी सामना करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर परिणाम होईल असा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही."

1 जूनपासून पावसाळा सुरू होत आहे

भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असतो. अशात आयपीएलबद्दल सांगायचे झाले तर भारतातील पावसाळ्याचा काळ पाहता जून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत भारतात याचे आयोजन करणे जवळपास अशक्य आहे.

सप्टेंबरपर्यंत टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त

भारताचा जून-जुलैमध्ये श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 मालिका होणार आहे. यानंतर ऑगस्ट महिन्यात झिम्बॉम्बे दौऱ्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. पुढील महिन्या आशिया कप होणार आहे. यामुळे भारतीय संघ ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून 15 नोव्हेंबरपर्यंत व्यस्त राहणार आहे. या दरम्यान फक्त सात दिवसांचा वेळ राहणार आहे. जर बीसीसीआयने आयपीएलसाठी एकतर्फी निर्णय घेऊन या मालिका रद्द केल्या तर आयसीसी त्याविरूद्ध कारवाई करू शकते.

ऑक्टोबरमध्ये टी -20 वर्ल्ड कप

यावर्षी ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान टी-20 वर्ल्डकप होणार आहे. टी-20 वर्ल्डकप रद्द झाला तर नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून ते डिसेंबर अखेरपर्यंत आयपीएल होण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या 8 संघात 64 परदेशी खेळाडू

आयपीएलच्या 8 संघामध्ये 189 खेळाडू असतात. यातील 64 खेळाडून परदेशातील आहेत. भारतात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध असल्यामुळे 31 मेपर्यंत त्यांना भारतात येणे आता अशक्य आहे.  तसेच, कोरोना थांबेपर्यंत परदेशी बोर्ड त्यांच्या खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी देणार नाहीत. 

आयपीएल रद्द केल्यास 3 हजार कोटींचे नुकसान

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आधीच म्हणाले की आयपीएल थेट रद्द करता येणार नाही. जर स्पर्धा रद्द झाली तर सुमारे 3 हजार कोटींचे नुकसान होईल.

बातम्या आणखी आहेत...