कोरोनाचा प्रभाव : ऑलिम्पिकनंतर आयपीएल रद्द होणार; विदेशी खेळाडूंना व्हिसा मिळणे कठीण

  • बीसीसीआयला 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान 

वृत्तसंस्था

Mar 26,2020 10:36:41 AM IST

मुंबई - आयपीएल १३ होणे कठीण झाले आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केल्यामुळे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत विदेशी खेळाडूंचा व्हिसा रद्द झाला. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अशात लीग रद्द होऊ शकते. टोकियो ऑलिम्पिक पहिलेच एका वर्षासाठी स्थगित करण्यात आले. बीसीसीआयने या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलला कोरोना व्हायरसमुळे १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले होते. मात्र, स्थिती आणखी गंभीर झाली आहे.


बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी मंगळवारी म्हटले की, ‘मी सध्या आयोजनावर काही सांगू शकत नाही. आम्ही त्याच स्थानी आहोत, ज्या वेळी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १० दिवसांत काही बदल झाला नाही.’ किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक वाडियांनी म्हटले की, ‘बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्यावर विचार केला पाहिजे. मेपर्यंत स्थितीत बदल न झाल्यास आमच्याकडे कितीसा वेळ शिल्लक राहील? तेव्हा विदेशी खेळाडूंना देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल का?’


यापूर्वी मंगळवारी बीसीसीआयने अधिकारी व संघमालकांची बैठक रद्द केली होती. मंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, जर ऑलिम्पिकला एका महिन्यासाठी पुढे ढकलले जाऊ शकते, तर आयपीएल छोटी स्पर्धा आहे. ती स्थगित किवा रद्द केली जाऊ शकते. त्याचे आयोजन करणे कठीण होत चालले आहे. सरकार विदेशी खेळाडूंना परवानगी देण्याचा विचारदेखील करत नाही. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर सर्व अशक्य होत आहे. लाॅकडाऊन हटल्यानंतरदेखील १४ एप्रिलनंतरदेखील प्रतिबंध असेलच.’


बीसीसीआयला ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान

लीग रद्द झाल्यानंतर बीसीसीआयला जवळपास ४ हजार कोटी रुपये नुकसान होईल. ३३०० कोटी रुपये तर केवळ प्रक्षेपणाच्या हक्काचे मिळतात. दुसरीकडे, आयपीएल फ्रँचायझीला १००-१०० कोटी रुपये नुकसान होईल.

X