आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Are Losing, Kohli Rohit Are Celebrating Holidays: Foreign Players Playing In IPL Join The Team, But India's Senior Players Need Rest.

भारत पराभूत होतोय, कोहली-रोहित मात्र सुट्टीवर:IPL खेळणारे परदेशी खेळाडू मैदानात, पण भारताचे वरिष्ठ खेळाडू घेताहेत सुट्टीचा आनंद

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. रविवारी कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा डाव गडगडला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाला 6 गडी गमावून केवळ 148 धावाच करता आल्या.

त्याचवेळी, रविवारी विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो समुद्रकिनाऱ्यावर एकटा बसलेला दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानेही मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्टी साजरी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

वरिष्ठ खेळाडूंच्या रजा आणि इकडे होत आहे संघाचा पराभव

आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की जर IPL मध्ये खेळणारे परदेशी खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघात सामील झाले असतील तर विराट आणि रोहितला संघात सामील होण्यात काय अडचण होती. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या आणि ड्वेन प्रिटोरियस भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळत आहेत.

हे सर्व खेळाडू IPL मध्येही खेळत होते. ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि जॉनी बेअरस्टो हे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळत आहेत. हे खेळाडूही IPL चा भाग होते.

काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत होता.
काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत होता.

त्याचवेळी राशिद खान झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेत खेळत आहे. जो IPL चॅम्पियन गुजरात संघाचा भाग होता. निकोलस पूरन हा पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजकडून खेळत होता. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतही IPL खेळलेले अनेक खेळाडू उपस्थित होते. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि जोस हेझलवूड हे ऑस्ट्रेलियाच्या संघात होते, पण टीम इंडियाच्या बाबतीत असे काही झाले नाही.

रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्याचवेळी रोहितलाही फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. त्याने 14 सामन्यात 20 च्या सरासरीने फक्त 268 धावा केल्या. विराटच्या बॅटनेही IPL मध्ये काही खास कामगिरी केली नाही. हंगामात तीन वेळा तो गोल्डन डकवर, म्हणजे पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. कोहलीने 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट फक्त 115.99 होता.

यावर्षी टीम इंडियाला नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कपही खेळायचा आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताच्या समान गटात दक्षिण आफ्रिका आहे. अशा स्थितीत या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी खेळाडूंना रजा देणे समजण्यापलीकडे आहे. सलग दोन पराभवांचा फटका टीम इंडियालाही बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...