आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने शनिवारी देशातील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेश निश्चित केला. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रंगतदार सामना ड्रॉ झाली. मात्र, पहिल्या डावातील आघाडीने मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. दुसरीकडे माजी कर्णधार व सध्याचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शन आणि आदित्य श्रीवास्तवच्या नेतृत्वात मध्य प्रदेश संघाने अंतिम फेरीचा पल्ला गाठला. मध्य प्रदेश संघाने उपांत्य सामन्यात अभिमन्यूच्या बंगाल टीमला धूळ चारली. मध्य प्रदेश संघाने १७४ धावांनी सामना जिंकला. विजयाच्या ३५० धावांच्या प्रत्युत्तरात बंगाल टीमचा दुसऱ्या डावात १७५ धावांवर धुव्वा उडाला. त्यामुळे मध्य प्रदेश संघाला १९९९ नंतर अंतिम फेरी गाठता आली.
मध्य प्रदेश टीमने २३ वर्षांनंतर फायनल गाठली आहे. आता या संघाला फायनलमध्ये ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई टीमच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले. बुधवारपासून बंगळुरूच्या मैदानावर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वात १९९९ मध्ये मध्य प्रदेश संघाने पहिल्यांदा फायनल गाठली होती.
मुंबईचे दोन माजी खेळाडू समोरासमोर
संघाने सहा वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला आहे. आता रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान मुंबईचे दोन माजी क्रिकेटपटू समोरासमोर असतील. यात चंद्रकांत पंडित आणि अमोल मुजुमदार यांचा समावेश आहे. सध्या हे दोन्ही खेळाडू कोचच्या भूमिकेत आहेत. चंद्रकांत हे मध्य प्रदेश आणि अमोल मुजुमदार हे मुंबई संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे आता या दोन्ही प्रशिक्षकांमध्ये किताब जिंकण्यासाठीची खास चुरस रंगणार आहे. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशचे पारडे जड मानले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.