आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलामीवीर मेघना (५२) व हेमलताने (६५) रेल्वे संघाला बुधवारी सीनियर महिला टी-२० लीगमध्ये चॅम्पियनचा बहुमान मिळवून दिला. स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली रेल्वे संघाने फायनलमध्ये महाराष्ट्र टीमचा पराभव केला. रेल्वेने १८.१ षटकांत ७ गड्यांनी अंतिम सामना जिंकला. यासह रेल्वे संघाने दहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला. तसेच स्मृतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाला पाचव्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून फायनलमध्ये नाशिकच्या माया साेनवणेने दोन आणि आैरंगाबादच्या मुक्ता मगरेने एक बळी घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत महाराष्ट्र संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १६० धावा काढल्या. प्रत्युत्तरात रेल्वे संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात १८.१ षटकांत दणदणीत विजय संपादन केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.