आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी करंडक:महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ संघ सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान विदर्भ, मुंबई आणि महाराष्ट्र संघांना आता देशातील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजयाची संधी आहे. यजमान विदर्भ संघ आपल्या नागपूरच्या व्हिसीए मैदानावर आज मंगळवारपासून त्रिपुरा टीमविरुद्ध सामना खेळणार आहे. विदर्भ संघाने आपल्या घरच्या मैदानावर विजयी सलामी दिली. तसेच मुंबई संघाचा स्पर्धेतील दुसरा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध हाेणार आहे. मुंबई संघाने घरच्या मैदानावर दिल्ली संघाचा पराभव केला. यासह टीमला दमदार सुरुवात करता आली. तसेच राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ आजपासून राजकाेटच्या मैदानावर साैराष्ट्र संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. महाराष्ट्र संघानेही स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली आहे. आता हे तिन्ही संघ सलग दुसऱ्या विजयासाठी उत्सुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...