आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी. के. नायडू क्रिकेट स्‍पर्धा:महाराष्ट्राची विदर्भावर 29 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला, सिद्धेशची अष्टपैलू खेळी, शुभमचे 7 बळी

विजयवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या २५ वर्षांखालील मुलांच्या सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत सिद्धेश वीरची अष्टपैलू खेळी व शुभम कोठारीच्या (७ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने विदर्भावर २९ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात महाराष्ट्राने सर्वबाद ३७८ धावा काढल्या. यात सलामीवीर कर्णधार पवन शहाने ९६ धावा, अष्टपैलू सिद्धेश वीरने ११६ धावांची शतकी खेळी केली. आनंद ठेंगेने ६० धावा ठोकल्या. विदर्भाच्या हर्ष दुबेने सर्वाधिक ६ बळी टिपले. प्रत्युत्तर पहिल्या डावात विदर्भ संघाकडून सलामीवीर ए. मोखाडेने १०३ धावांची खेळी करत संघाला ३७९ धावांचा टप्पा गाठून देत १ धावाची आघाडी मिळवून दिली.

महाराष्ट्राकडून सिद्धेश वीरने २, डावखुरा फिरकीपटू शुभम कोठारीने ५ बळी घेतले. दुसऱ्या डावात पवन शहा (६८), सिद्धेश वीर (३६) व आनंद ठेंगेने (४१ महाराष्ट्राला २११ धावांचा टप्पा गाठून दिला. विदर्भाच्या हर्ष दुबेने ५ बळी घेतले. अखेरच्या दिवशी विदर्भास विजयासाठी केवळ २१२ धावांची गरज होती. महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरने आपल्या ऑफस्पिनवर विदर्भाला १८३ धावांत गारद करत ८ बळी घेतले. शुभम कोठारीने २ गडी टिपले.

बातम्या आणखी आहेत...