आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंडमधील सर्वात मोठ्या क्लबपैकी एक असलेल्या मँचेस्टर युनायटेडला रविवारी रात्री त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. युनायटेडचा प्रतिस्पर्धी क्लब लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीग अर्थात EPL च्या लीग सामन्यात त्यांचा 7-0 ने पराभव केला. लिव्हरपूलकडून कोडी गाकपो, मोहम्मद सलाह, डार्विन न्युनेज आणि रॉबर्टो फिर्मिन्हो यांनी गोल केले.
दुसऱ्या हाफमध्ये केले 6 गोल
42 व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघाकडून गोल झाला नव्हता. स्कोअर 0-0 असा होता. कोडी गाक्पोने 43व्या मिनिटाला गोल केला. हाफ टाईमनंतर लगेचच 47व्या मिनिटाला संघाचा स्ट्रायकर डार्विन न्युनेझने गोल केला. त्यानंतर 50 व्या मिनिटाला गाकपोने दुसरा गोल केला आणि संघ 3-0 असा पुढे गेला. न्युनेझने 75व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्याचवेळी मोहम्मद सलाहने 66व्या आणि 83व्या मिनिटाला गोल केला. बदली खेळाडू रॉबर्टो फिर्मिन्होने 88व्या मिनिटाला सातवा गोल केला.
लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात स्पर्धा का आहे?
आपण इंग्लिश फुटबॉलच्या इतिहासाबद्दल माहिती घेऊ या… तर लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड हे इंग्लंडमधील दोन सर्वात मोठे क्लब आहेत. दोन्ही संघांमधील सामन्याला नॉर्थवेस्ट डर्बी म्हणतात. दोघांचेही त्यांच्या शहरात प्रतिस्पर्धी आहेत. मँचेस्टर युनायटेडचा प्रतिस्पर्धी मँचेस्टर सिटी आहे. आणि लिव्हरपूलचा प्रतिस्पर्धी एव्हर्टन. तरीही, दोन्ही क्लब एकमेकांना आपले सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानतात.
19व्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिक क्रांतीदरम्यान, मँचेस्टर आणि लिव्हरपूल हे दोन्ही फुटबॉल क्लब बनण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होते. मँचेस्टरमध्ये कापडाचे मोठे उद्योग होते. लिव्हरपूलमध्ये पूर्वी एक बंदर होते. शतकाच्या शेवटी मँचेस्टरचा कालवा पूर्ण झाला. यामुळे लोक आता मँचेस्टर बंदरात जाऊ लागले. त्यामुळे लिव्हरपूलमध्ये बेरोजगारी वाढली आणि लिव्हरपूलच्या लोकांना मँचेस्टरच्या लोकांचा राग येऊ लागला.
जेव्हा दोन्ही भागात क्लब तयार झाले तेव्हा दोन्ही शहरांमधील वैर वाढतच गेले. एका क्षणी ते कमी झाले. पंरतु, मँचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूल क्लबने इंग्लंडमधील सर्वोत्तम संघ बनण्यासाठी म्हणून स्पर्धा सुरू ठेवली, दोन्ही संघ अनेक अंतिम फेरीत खेळले. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील एकमेकांच्या संघाविरोधात रोष आहे.
आर्सेनल टॉप वर आहे
EPL मध्ये 20 संघांमध्ये सामने खेळले जातात. प्रत्येक संघ एकूण 38 सामने खेळतो. 38 सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले जाते. सध्या लंडनचा संघ आर्सेनल 63 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर मँचेस्टर युनायटेड 25 सामन्यांनंतर 49 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 25 सामन्यांनंतर 42 गुणांसह टोटेनहॅम चौथ्या आणि लिव्हरपूल पाचव्या स्थानावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.