आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Matthew Hayden Came Out In Support Of Bhuvneshwar: Said He Can Bowl Well Even In The Death Over, Matthew Hayden Has Won India Earlier

मॅथ्यू हेडनने केली भुवीची पाठराखण:म्हणाला- डेथ ओव्हरमध्येही तो चांगली गोलंदाजी करू शकतो, यापूर्वी भारताला जिंकून दिले आहे

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने भूवीची पाठराखन केली आहे. त्याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे समर्थन केले आहे. भुवनेश्वरच्या गेल्या काही सामन्यांतील खराब कामगिरीनंतर भुवनेश्वर भारतासाठी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यास योग्य आहे का, अशी चर्चा सुरू झालीये.

पण याच विषयावर आपले मत मांडताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर म्हणाला, 'मी या मताशी सहमत नाही. मला वाटते की तो डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्याने ते केलेही आहे.

विशेष म्हणजे भुवीची भूमिका सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेण्याची आहे, पण जर कर्णधाराला शेवटच्या एक-दोन षटकांमध्ये त्याला गोलंदाजी द्यायची असेल तर भुवनेश्वरही ते सुद्धा करू शकतो. याआधीही त्याने अशी कामगिरी केली असून भारताला विजय सुद्धा मिळवून दिले आहे.

डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर सतत फ्लॉप होत आहे

आशिया कप 2022 भारत-पाकिस्तान सामना

आशिया चषक 2022 मध्ये भारताने एकदा पाकिस्तानला पराभूत केले होते, परंतु सुपर-4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भुवनेश्वरकडे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आली होती.

भुवनेश्वर 19व्या षटकात पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजीसाठी आला होता. पाकिस्तानकडून आसिफ अली आणि खुशदिल शाह फलंदाजी करत होते. त्यांना विजयासाठी 12 चेंडूत 26 धावा करायच्या होत्या.

भुवीने ओव्हरचा पहिला चेंडू वाईड फेकला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आसिफने षटकार ठोकला. त्यानंतर भुवनेश्वरने आणखी एक वाईड बॉल टाकला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर खुशदिल आणि शेवटच्या चेंडूवर आसिफने चौकार मारला. या षटकात भुवनेश्वरने पाकिस्तानला एकूण 19 धावा दिल्या.

आशिया कप 2022 भारत-श्रीलंका सामना

सुपर-4 मधील भारत-पाकिस्तान सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली नाही, तरीही भुवनेश्वरला भारत-श्रीलंका सामन्यातील डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. शेवटच्या दोन षटकात श्रीलंकेला विजयासाठी 21 धावांची गरज होती.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका आणि भानुका राजपक्षे फलंदाजी करत होते. भुवनेश्वरने ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर फक्त 1-1 धावा दिल्या, पण त्यानंतर त्याने 2 वाईड चेंडू टाकले. परिणामी श्रीलंकेला कोणतेही प्रयत्न न करता 2 धावा मिळाल्या. यानंतर 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शनाकाने चौकार ठोकला.

भुवनेश्वरच्या चौथ्या चेंडूवर शनाकाने पुन्हा चौकार मारला. त्याने पाचवा चेंडू यॉर्कर टाकला, पण त्यावरही शनाकाने एक धाव घेतली. ओव्हरचा शेवटचा चेंडू भुवीने लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न केला, राजपक्षेने एक धाव घेतली. अशाप्रकारे या महत्त्वाच्या सामन्यात 19व्या षटकात भुवीने श्रीलंकेला 14 धावा दिल्या.

भारत-ऑस्ट्रेलिया T-20 सिरीज

20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे भारताच्या घरच्या टी20 सिरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना खेळला गेला. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जसप्रीत बुमराहचा या संघात समावेश नाही. अशा स्थितीत या सामन्यात भुवनेश्वरकडून टीम इंडियाला अनेक अपेक्षा होत्या मात्र भुवनेश्वरची कामगिरी निराशाजनक ठरली.

त्याने 4 षटकात 52 धावा दिल्या. सिरिजमध्ये पहिल्या सामन्यात भुवनेश्वरला एकही विकेट घेता आली नाही. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना भुवनेश्वरने ऑस्ट्रेलियाला 16 धावा दिल्या. या षटकात भुवनेश्वरच्या चेंडूवर फलंदाजांनी तीन चौकार मारले.

भुवनेश्वरची पहिली आशिया कप 2022 आणि आता भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सिरिजमध्ये डेथ ओव्हर्समध्ये कामगिरी निराशाजनक आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी या सिरिजकडे भारताच्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून पाहिले जात आहे. अशा स्थितीत या सामन्यातील भारतीय संघाची कामगिरी प्रत्येक दृष्टीने महत्त्वाची आहे.

बातम्या आणखी आहेत...