आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • World Shortest Cricketer; Who Is Corey Adams (Wonder Kid) ?, Meet The World's Youngest Cricketer: Only 3 year old Corey Adams Plays Like A Star Cricketer, Is A Member Of St Braves Club

भेटा जगातील सर्वात चिमुकल्या क्रिकेटपटूला ​​​​​​​:3 वर्षाचा कोरी अ‍ॅडम्स​​​​​​​ खेळतो स्टार क्रिकेटर सारखा, सेंट ब्रेव्हल्सचा आहे सदस्य

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा आहे कोरी अ‍ॅडम्स, केवळ 3 वर्षाचा... क्रिकेटच्या स्टंपाएवढी त्याची उंची असेल. मात्र तूम्हाला ऐकून नवल वाटेल की हा 3 वर्षाचा कोरी जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. आहे की नाही आश्चर्यचकीत करणारी गोष्ट. विशेष म्हणजे या कोरीला ‘वंडर किड’ म्हणूनही ओळखले जाते.

कारणही तसेच आहेच तो स्वतःहून तिप्पट मोठ्या असलेल्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळतो. तो एखाद्या व्यावसायिक क्रिकेटपटूंप्रमाणेच फलंदाजी आणि गोलंदाजीही करतो. या छोट्या अष्टपैलू खेळाडूचे कौशल्य असे आहे की ते चांगल्या चांगल्या क्रिकेटपटूंनाही आश्चर्यचकित करतो.

कोरी अ‍ॅडम्स हा अंडर-11 क्लब क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. कोरीने सेंट ब्रेव्हल्ससाठी लिडने सीसी विरुद्ध केवळ 3 धावां देवून दोन बळी घेतले आणि 12* धावा काढल्या आहेत. तो दररोज पहाटे साडेपाच वाजता उठून सराव करतो. कोरी नियमित संघाचा भाग नाही, परंतु त्याच्या वडिलांच्या क्लब सेंट ब्रेवेल्स च्या सराव सत्रांमध्ये सामील होतो.

वडील टॉम म्हणाले - मी प्रामाणिकपणे सांगतो की तो माझ्यापेक्षा चांगला खेळाडू

कोरीचे 33 वर्षाचे वडील टॉम अ‍ॅडम्स, ग्लुसेस्टरशायरमध्ये राहतात. ते म्हणतात,की 'कोरीला क्रिकेट खेळणे खूप आवडते. मी प्रामाणिकपणे सांगतो की तो माझ्यापेक्षा चांगला खेळाडू आहे.

तो अजून 4 वर्षांचाही झाला नाही तर तो अष्टपैलू खेळाडू सारखा कामगिरी करतो. 2019 पासून तो प्रत्येक सामन्यात जातो आणि तेव्हापासून त्याने बॉल आणि बॅटसोबत मैत्री केली आहे.

ऑनलाइन ऑर्डर करून पॅड हातमोजे, लहान बॉलिंग मशीन देखील मागवली

टॉम अ‍ॅडम्स म्हणतात की त्याने वयाच्या 16 महिन्यांपासूनच बॅटिंग-बॉलिंगला सुरुवात केली होती, म्हणून आम्ही त्याच्यासाठी संपूर्ण क्रिकेट किट मागवली आहे. लहान पॅड आणि हातमोजे उपलब्ध नव्हते, म्हणून आम्ही त्यांचा ऑनलाइन शोध घेतला. आम्ही एक छोटी बॉलिंग मशीन पण त्याच्यासाठी आणली होती.

अशाप्रकारे क्रिकेट खेळायला केली सुरुवात

कोरीचे बिल्डर असलेले वडील टॉम यांनी त्याला केवळ त्यांचा खेळ दाखवण्यासाठी मैदानात घेऊन जायचे आणि तेथूनच त्याच्यात क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्याला इंग्लंडकडून खेळायचे आहे.

तो त्याच्या स्थानिक क्रिकेट क्लबसाठी हंगामाच्या शेवटी ज्युनियर खेळाडूंसोबत खेळतो. सर्व 15 ते 18 वयोगटातील आहेत, परंतु अद्यापही त्याचे संघासाठी खेळण्यासाठीचे वय पुरेसे नाही.

बातम्या आणखी आहेत...