आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला क्रिकेट:मिताली दसहजारी; लिजेलच्या करिअरमधील सर्वोच्च खेळीने दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी

लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिण आफ्रिकेची तिसऱ्या वनडेत डीएलनुसार भारतावर 6 धावांनी मात

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार ६ धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर द. आफ्रिकेने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली. आता मालिकेतील चाैथ्या सामन्यावर सर्वांची नजर असेल. हा सामना यजमान भारतीय महिला संघासाठी निर्णायक असेल. यातील पराभवाने भारतावर मालिका पराभवाची नामुष्की आेढावणार आहे.

द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेसाठी तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा पराभव झाला.

भारतीय सलामीवीर फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज दुसऱ्या चेंडूवर खातेही न उघडता तंबूत परतली. पूनम राऊतसोबत ६४ धावांच्या भागीदारीनंतर स्मृती मानधना (२५) बाद झाली. कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्माने ३६-३६ धावांची खेळी केली. मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारी पहिली भारतीय खेळाडू बनली. तिचा आता माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, याच्या बळावर तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दहा हजार धावांचा आकडा गाठता आला.

केवळ इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड््सने तिच्यापेक्षा अधिक १०२७३ धावा काढल्या आहेत. भारतीय संघाने ५ बाद २४८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, द. आफ्रिकेच्या सलामीवीर लिजेल ली हिने १३२ धावांची नाबाद खेळी केली. ही वनडेतील तिची सर्वोच्च खेळी आणि दक्षिण आफ्रिकेकडून तिसऱ्या क्रमांकाची मोठी खेळी ठरली. लिजेलने डू प्रीजसाेबत (३७) तिसऱ्या गड्यासाठी ९७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान ४६.३ षटकांत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने ४ बाद २२३ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे सामना थांबवावा लागला. त्यानंतर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्ययात आला.

बातम्या आणखी आहेत...