आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीची घोषणा:मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, जगातील सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि वनडे, कसोटी संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मिताली राज जगातील सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज असून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक विश्वचषक खेळण्याच्या बाबतीत मिताली नंबर वन आहे. मितालीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर निवृत्तीची घोषणा करताना चाहत्यांचे आभार मानले. तसेच ‘मी आता येथून माझ्या डावावर लक्ष केंद्रित करेल, ज्यात मला तुमच्या प्रार्थना आणि समर्थनाची अपेक्षा आहे.’ मितालीची २३ वर्षांची कारकीर्द संपली.

मितालीने म्हटले की, ‘इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे ही एक सन्मानाची गोष्ट होती. त्यामुळे मला एक व्यक्ती म्हणून आकार दिला. भारतीय महिला क्रिकेटलाही आकार देण्यास मदत झाली’

मितालीची कारकीर्द : मितालीने २६ जून १९९९ रोजी आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाकडून पदार्पण केले. मितालीने २३ वर्षांच्या तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १२ कसोटी, २३२ वनडे आणि ८९ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

बातम्या आणखी आहेत...