आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:/ ‘मी तुमचा कर्णधार, मला मूर्ख नका बनवू’ या शब्दात शमीला धाेनीने सुनावले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • धोनी नेतृत्वादरम्यान गोलंदाजांना कडक शब्दात समजावत होता

धोनी नेतृत्वादरम्यान गोलंदाजांना कडक शब्दात समजावत होता. ही घटना वेगवान गोलंदाज मो. शमीने मनोज तिवारी सोबत इन्स्टाग्रामवर सांगितली. शमीने म्हटले की, “२०१४ मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. वेलिंग्टनमध्ये दुसऱ्या कसोटीत १४ धावांवर असताना मॅक्युलमचा झेल कोहलीकडून सुटला. 

मॅक्युलमने दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत ३०० धावा काढल्या. चौथ्या दिवशी मी बाउन्सर टाकला व तो माही भाईच्या डोक्यावरून निघून गेला. मी त्याला म्हटले, चेंडू हातातून सुटला. तेव्हा माही भाईने मला थोड्या कठोर शब्दात म्हटले - देख बेटा, खूप जण माझ्यासमाेर आले. अनेक जण खेळून गेले, खोटे नको बोलू. असे मूर्ख दुसऱ्या कोणाला बनव.’

बातम्या आणखी आहेत...