आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • MS Dhoni; IPL 2023 | MS Dhoni IPL Captaincy And Winning Record, Dhoni Is The Captain Of CSK, CSK Changed Captain Twice Last Season, Now CEO Said – Mahi Will Take The Reins

धोनीच असेल CSK चा कर्णधार:मागील हंगामात CSK ने दोनदा बदलला ​कर्णधार​​​​​​​,आता CEO म्हणाले–माहीच धुरा सांभाळेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीच करणार असल्याच्या वृत्ताला, फ्रँचायझीचे CEO काशी विश्वनाथ यांनी दुजोरा दिला आहे.

गेल्या हंगामात CSK ने दोनदा कर्णधार बदलला. CSK मध्ये आधी धोनीने स्वतः कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते.

पुढे सततच्या खराब कामगिरीमुळे जडेजाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा काही सामन्यांसाठी धोनीने कर्णधारपद सांभाळले.

पुढील हंगामात चेन्नई नव्या कर्णधारासह मैदानात उतरेल, असे बोलले जात होते. खुद्द CEO नीच निवेदन देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पुढील IPL हंगामात महेंद्रसिंग धोनीच चेन्नई संघाचा कर्णधार असेल, असे विश्वनाथ यांनी सांगितले.

रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार म्हणूनही धोनीने धुरा सांभाळली

IPL च्या सुरुवातीपासून धोनी CSK चा कर्णधार आहे. आतापर्यंत त्याने संघाला 4 वेळा विजेतेपदही मिळवून दिले आहे. जेव्हा संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली त्यावेळी धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे एका हंगामासाठी नेतृत्व केले. त्यानंतर तो स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळला. धोनीने या हंगामात केवळ 232 धावा केल्या.

IPL संघाच्या कर्णधारपदामध्ये धोनी अजूनही पहिल्या क्रमांकावर

IPL संघाच्या कर्णधारपदाच्या बाबतीत, एमएस धोनी अजूनही नंबर-1 आहे. लीगच्या 210 सामन्यांमध्ये त्याने 2 संघांचे (CSK आणि RPS) नेतृत्व केले आहे. यापैकी त्याने 123 जिंकले आहेत.

तर संघाने 86 सामने गमावले. तर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली 143 पैकी केवळ 79 सामने जिंकले आहेत.

IPL-2022 मध्ये गुणतालिकेत संघ 9 व्या क्रमांकावर होता

गेल्या हंगामात संघाची कामगिरी खराब झाली. तिला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले आणि 10 सामने तिला गमवावे लागले. CSK च्या वाट्याला केवळ आठ गुण होते.

बातम्या आणखी आहेत...