आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महेंद्रसिंह धोनीच्या यशाचा मंत्र:‘भावनांनी डोके वर काढूच नये इतके स्वत:ला गुंतवून ठेवा!'

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या यशाचा मंत्र
कष्ट, नशीब, संयम, समर्पण... या सर्व गोष्टी आपापल्या जागी बरोबर आहेत. या सर्वात स्वत:शी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे. तुम्ही प्रामाणिक नसाल तर मात्र स्वत:मध्येच गुंतत जाल.

‘मलाही प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणे अडणची येतात. चिडचिड होते. खासकरून तेव्हा, जेव्हा गोष्टी आपल्या बाजूने नसतात. परंतु मी नेहमीच विचार करतो की हे नैराश्य आपल्या संघासाठी चांगले आहे काय? अशा परिस्थितीत मग मी विचार करतो की आता काय करायला हवे? चुका कोणाकडूनही होतात. एखाद्याकडून होते. पूर्ण संघाकडून होऊ शकतात... आमचा प्लॅन होता त्यानुसार गोष्टी जुळून आल्या नाहीत, अशा परिस्थितीत मी विचार करतो की सध्या चांगले काय राहू शकते? नैराश्य, चिडचिड, राग निराशा.. यापैकी रचनात्मक काहीच नाही. त्यामुळे मी स्वत:ला समजावतो की, या सर्व भावनांहून मोठे असे एक काम आहे जे यावेळी मी मैदानावर करू शकतो. अशावेळी मी असा विचार करू लागतो की, कोणत्या खेळाडूला काय जबाबदारी द्यायची. कोणत्या योजनेवर काम केले पाहिजे. त्यामुळे मला स्वत:वर नियंत्रण मिळवण्यात मदत होते. मी स्वत:ला इतका व्यस्त करतो की, भावनांना मी शिरजोर होऊ देत नाही. त्यामुळे मी मैदानावर तुम्हाला कूल भासतो. मी मानतो की माणसांमध्ये अनेक प्रकारचा भावना असतात. अन् भारतीय माणूस तर खूपच भावनाप्रधान आहे. त्यामुळे माझ्या मनात भावनाच येत नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु मी दरवेळीच प्रयत्न करत असतो व या भावनांवर नियंत्रण मिळवतो. कारण मला माहीत आहे, भावनांवर नियंत्रण मिळवले की मी जास्त रचनात्मक होऊन काम करू शकेन.

क्रिकेट माझ्या जीवनात आले तेव्हा मी हे केवळ आनंद लुटण्यासाठी खेळत होतो. आपण देशासाठी खेळू असा विचार मी कधीच केला नव्हता. मी तर फक्त आनंदी राहण्यासा‌ठी आणि आपल्या शाळेतील संघासाठी क्रिकेट खेळायचो. तेथे जेव्हा चांगले खेळू लागलो तेव्हा पुढचा विचार सुरू झाला... मग सोळा वर्षाखालील संघात निवड झाली. तेथेही चमकलो. त्यानंतर जिल्हा संघाचा भाग बनलो. आता राज्यासाठीही खेळावे असे वाटत होते. हळूहळू भारतीय संघापर्यंत पोहोचलो. मी लहान-लहान लक्ष्ये बनवली आणि ती गाठत भारतीय क्रिकेट संघाचा भाग बनलो. मला वाटते लहान लक्ष्य निश्चित करणे आणि ते गाठणे सोपे व मजेशीर असते. मोठी लक्ष्ये सर्वांनाच हैराण करून सोडतात. क्रिकेटला मी माझे दुसरे जीवनच मानतो. त्यात काहीच निश्चित नसते. थोडा नशिबाचाही भाग असतो. एक नाणे उधळून आपण क्रिकेटचा सामना सुरू करतो ही एक अतिशय रंजक गोष्ट आहे. ते नाणे कोणाच्याही बाजूने पडू शकते.

सलामीवीरासाठी पहिल्या चेंडूपासूनच अनिश्चिततेचा खेळ असतो. तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज दुसऱ्याच षटकाच खेळपट्टीवर येऊ शकतो किंवा २५ व्या षटकातही. माझ्याबाबत मात्र ही अनिश्चितता काहीशी कमीच राहिली. कारण भारतीय परिवारातील सर्वात मोठी चिंता मी आधीच दूर केली होती. रेल्वेतील नोकरीनंतर माझे कुटुंबीय निश्चिंत होते. क्रिकेटमध्ये याचे काही झाले नाही तरी हा काही तरी करेलच असे त्यांना वाटे. पण तशी वेळ आली नाही. मी माझ्या उणिवा स्वीकारत गेलो. मी स्वत:शी प्रामाणिक राहिलो. तुम्ही स्वत:शीच प्रामाणिक राहिला नाही तर दुसऱ्यांबरोबर कसे राहाल? त्यामुळे स्वत:च्या उणिवा स्वीकारणे सोपे जाते. तुम्ही चांगले खेळाडू नसाल, चांगल्या व्यक्ती नसाल मात्र उणिवा स्वीकारल्यास दूर करण्याचाही प्रामाणिक प्रयत्न कराल. तुम्ही कुटुंबाकडून मदत घ्याल, वरिष्ठ वा मित्रांशी मदत मागाल. मी असेच केले आणि पुढे गेलो. कष्ट, नशीब, संयम, समर्पण... सर्व आपल्या जागी बरोबर आहे. या सर्वात स्वत:शी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे. तुम्ही प्रामाणिक नसाल तर स्वत:मध्येच गुंतत जाल. प्रामाणिकपणामुळेच मी इथंपर्यंत पोहोचलो. ज्याची कल्पनाही मी कधी केली नव्हती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser