आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • MS Dhoni Saqlain Mushtaq | Pakistan Cricket Board (PCB) Slammed Spinner Saqlain Mushtaq For Praising MS Dhoni On His Youtube Channel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनीच्या कौतुकावर तीळ-पापड:माहीचे कौतुक करणाऱ्या सकलैन मुश्ताकवर भडकला पीसीबी; म्हणे, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सदस्य आहात, अटींचे उल्लंघन कराल तर कारवाई

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनीला खरा राजदूत म्हणत सकलैनने युट्यूब चॅनलवर केले होते कौतुक

नुकतेच रिटायरमेंटची घोषणा करणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची जगभरात चर्चा आहे. त्याच्या कारकीर्दीचे कौतुक केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही केले जाते. पाकिस्तानचा प्रसिद्ध माजी क्रिकेटर सकलैन मुश्ताकने सुद्धा त्याचे तोंडभर कौतुक केले. परंतु, पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा यावर तीळ-पापड झाला आहे. सकलैन मुश्ताक यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करून माहीचे कौतुक केले होते. त्यावर पीसीबीने त्यांना फटकारले आहे. तुम्ही पीसीबीचे सदस्य आहात. एक युट्यूब चॅनल चालवू नये अशी तंबी सुद्धा पीसीबीकडून देण्यात आली आहे. सकलैन मुश्ताक पीसीबीच्या हाय परफॉर्मंस सेंटरमध्ये इंटरनॅशनल प्लेअर डेव्हलपमेंट विंग हेड आहे.

धोनीचे कौतुक करताना बीसीसीआयवर केली होती टीका

धोनीसारख्या एका मोठ्या खेळाडूसोबत बीसीसीआयचे वर्तन योग्य नाही. त्याला मैदानावर शेवटचा निरोप द्यायला हवा होता. हा एक प्रकारे बीसीसीआयचा पराभव आहे असे सकलैनने म्हटले होते. सकलैन मुश्ताकच्या याच विधानांवरून पीसीबीने नाराजी व्यक्त केली. धोनी खरा राजदूत होता असेही सकलैनने म्हटले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटमध्ये सकलैनचे डोकावणे सुद्धा पीसीबीला फारसे आवडले नाही.

पीसीबीने सर्वच कोचना दिली तंबी

पीसीबीने केवळ सकलैन मुश्ताक नव्हे, तर इतर प्रशिक्षकांना सुद्धा तंबी दिली आहे. पीसीबीच्या सेवा शर्तींचे उल्लंघन करू नका. अन्यथा कारवाई होईल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. सकलैनपूर्वी माजी क्रिकेटर बासित अली, फैसल इकबाल, मुहंमद वसीम आणि अब्दुल रज्जाक यांनी सुद्धा युट्यूबवर चॅनल सुरू केले आहेत. तुम्ही बोर्डाचे सदस्य आहात असे म्हणत त्यांना पीसीबीने फटकारले.

कोचला माध्यमांशी बोलण्यास मज्जाव

पीसीबीने आपल्या कोचना मीडियाशी बोलण्यास बंदी घातली आहे. आता बोर्डाची मंजुरी घेतल्याशिवाय कोच मीडियाशी बोलू शकणार नाहीत. यापूर्वी सुद्धा बोर्डाने भारत पाकिस्तान संबंधांवर आणि खेळाडूंवर बोलणे टाळण्याचा सल्ला दिला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser