आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवस धोनीच्या नावावर राहणारे विक्रम:सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत कर्णधारपद भूषवले, सर्वाधिक स्टंपिंग आणि सर्वाधिक षटकार ठोकणारा विकेटकीपर आहे माही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनीने 332 सामन्यांत कर्णधारपद भूषवले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 195 स्टपिंग केल्या

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. 2014 मध्ये त्याने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली होती. असे असले तरी तो आयपीएलमध्ये आपली जादू दाखवणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत असल्याची स्वातंत्र्यदिनी घोषणा केली. भारतीय क्रिकेटचे स्वरूप बदलणार्‍या या खेळाडूच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत, जे दीर्घकाळपर्यंत त्याच्याच नावावर राहतील.

महेंद्र सिंह धोनीने 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यापेक्षा अधिक सामन्यांमध्ये कोणताही खेळाडू कर्णधार म्हणून खेळला नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने देखील तीनशे पेक्षा अधिक सामन्यांत कर्णधारपद भूषवले आहे. मात्र दोघेही धोनीच्या मागे आहेत. पाँटिंगने 324 तर फ्लेमिंगने 303 सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत.

धोनीने 195 स्टम्पिंग केल्या, सध्याच्या विकेटकीपर पैकी कोणाही 100 स्टम्पिंग करू शकला नाही

धोनीने त्याच्या कारकिर्दीत 195 स्टम्पिंग केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणी 150 पर्यंत पोहचला नाही. माहीने 359 षटकार ठोकले. विकेटकीपर फलंदाज म्हणून सर्वाधिक आहेत. सध्या सक्रीय असलेल्या खेळाडूंमध्ये मुशफिकुर रहीमने सर्वाधिक स्टम्पिंग केले. रहीमने आतापर्यंत 88 स्टम्पिंग केल्या आहेत.

सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर आहे कॅप्टन कूल
सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर आहे कॅप्टन कूल
सर्वाधिक षटकार ठोकणारा विकेटकीपर फलंदाजही आहे माही
सर्वाधिक षटकार ठोकणारा विकेटकीपर फलंदाजही आहे माही
एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपर
एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपर
वनडेत सर्वाधिक स्टंपिंग करणारा विकेटकीपर
वनडेत सर्वाधिक स्टंपिंग करणारा विकेटकीपर
सर्वाधिक कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवणारा विकेटकीपर
सर्वाधिक कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवणारा विकेटकीपर
टी-20 मध्ये सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषवले
टी-20 मध्ये सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषवले
बातम्या आणखी आहेत...