आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • MS Dhoni's Club Coach Chanchal Bhatarcharya On His Retirement। Dhoni Sensed That He Will Be Neglected By Selectors, That's Why He Announces Retirement

इंटरव्ह्यू:धोनीच्या क्लब कोचने सांगितले की - धोनी स्वत: विषयी चुकीची गोष्ट सहन करु शकत नाही, सिलेक्टर्स त्याच्याकडे दुर्लक्ष करतील हे त्याला कळाले, म्हणूनच निवृत्ती घेतली

राजकिशोरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
चंचल भट्टाचार्य (उजवीकडे) महेंद्रसिंग धोनीचे कमांडो क्रिकेट क्लबचे 1996 ते 2004 या काळात प्रशिक्षक होते - फाइल फोटो - Divya Marathi
चंचल भट्टाचार्य (उजवीकडे) महेंद्रसिंग धोनीचे कमांडो क्रिकेट क्लबचे 1996 ते 2004 या काळात प्रशिक्षक होते - फाइल फोटो
  • धोनीने 2021 चा टी-20 वर्ल्ड कप खेळायला हवा होता, थोडे थांबायचे असते - धोनीचे क्लब कोच

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपण संन्यास घेत असल्याची माहिती दिली. 1996 ते 2004 पर्यंत क्रिकेट क्लबमध्ये धोनीचे प्रशिक्षक राहिलेले चंचल भट्टाचार्य यांनी धोनी निवृत्तीवर म्हटले की, "मला त्याला 2021 चा टी-20 विश्वचषक खेळताना पाहायचे होते."

ते म्हणाले की, धोनी तंदुरुस्त होता. टी -२० मधील त्याचा विक्रमही उत्कृष्ट होता. परंतु, आपल्याकडे दुर्लक्ष केले जाईल हे त्याच्या लक्षात आले, म्हणून त्याला निवृत्ती घेणे अधिक चांगले वाटले. धोनीची निवृत्ती, त्याचा खेळ आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल विषयी बोलताना क्लब कोच भास्करशी बोलताना म्हणाले...

1. धोनीच्या निवृत्तीकडे आपण कसे पाहता?

चंचल : सिलेक्टर्स त्याच्या नावाचा विचार करणार नाहीत हे महेंद्रसिंग धोनीच्या लक्षात आले. तो आतापर्यंत भारतासाठी कृतज्ञतेने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला. त्याच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकला आणि कसोटी सामन्यातही आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांकावरही स्थान मिळवले. अशा परिस्थितीत तो आपला अपमान सहन करू शकत नव्हता. म्हणून त्याने कोणालाही काहीही न सांगता अचानक निवृत्तीची घोषणा केली.

2. त्याने निवृत्तीबाबत तुमच्याशी चर्चा केली होती का?

चंचल : धोनीच्या निवृत्तीची घोषणा करणे खरोखर आश्चर्यचकित करणारे आहे. धोनीने निवृत्तीबद्दल कधीच चर्चा केली नाही आणि त्याच्याशी झालेल्या संभाषणादरम्यानसुद्धा तो निवृत्तीची घोषणा करू शकतो हे समजू शकले नाही.

3. तुमच्या मते, धोनीने निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे का?

चंचल : मला धोनीला 2021 टी-10 वर्ल्ड कप पर्यंत खेळताना पाहायचे होते. तो तंदुरुस्त होता. टी-20मध्ये त्याचा चांगला रेकॉर्ड राहिला आहे. त्याने थांबायला हवे होते. दरम्यान संघात त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा अंदाज आला होता. म्हणूनच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

4. धोनीने लहानपणी देखील असेच आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतले होते का?

चंचल : माझ्या क्लबमध्ये खेळत असताना त्याने कधीही आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला नाही. 2007 पासून त्याला समजणे कठिण होते. तो केव्हा, काय निर्णय घेईल याबाबत कोणीच सांगू शकत नव्हते. एवढेच नाही तर, तो समोरच्याच्या मनाला वाचत होता. समोरचा व्यक्ती त्याच्याबद्दल काय विचार करतोय हे त्याला माहीत असायचे.

बातम्या आणखी आहेत...