आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WPL : MI VS UPW:मुंबईची फायनलमध्ये धडक, आता 26 मार्चला अंतीम सामना दिल्लीशी; इसाबेल वाँगची स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी सामन्यात संघाने यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव केला. मुंबईच्या इसाबेल वाॅंगने स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक घेतली. त्याचवेळी नताली सीव्हरने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी करीत मुंबई संघाला विजय मिळवून दिला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 4 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ 17.4 षटकांत 110 धावा करून सर्वबाद झाला.

नताली सीव्हरच्या नाबाद 72 धावा

पहिल्या डावात मुंबईकडून नताली सीव्हरने 38 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकारही मारले. त्यानंतर गोलंदाजीतही ग्रेस हॅरिसची महत्त्वाची विकेट घेतली. एवढेच नाही तर लाँग ऑनवर किरण नवगिरेचा महत्त्वपूर्ण झेलही तिने घेतला.

वाॅंगच्या नावावर WPL ची पहिली हॅट्ट्रिक

मुंबईच्या इसाबेल वाॅंगने महिला प्रीमियर लीगची पहिली हॅटट्रिक घेतली. 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तिने किरण नवगिरेला झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिमरन शेख आणि चौथ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनला बाद केले. पॉवरप्लेमध्ये वाँगने अ‌ॅलिसा हिलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिने 4 षटकात 15 धावा देत 4 गडी बाद केले.

वाँगशिवाय नताली सीव्हर ब्रंट, जिंतिमनी कलिता आणि हेली मॅथ्यूज यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

पॉवरप्लेमध्ये गमावले 3 गडी

183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात खराब झाली. 21 धावांवर संघाने 3 विकेट गमावल्या. श्वेता सेहरावत एक, ताहलिया मॅकग्रा 7 आणि अ‌ॅलिसा हिली 11 धावा करून बाद झाल्या. मुंबईकडून इसाबेल वाॅंग आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. एक फलंदाज धावबाद झाली. पॉवरप्लेच्या 6 षटकांत यूपी संघाने 3 गडी गमावून 46 धावा केल्या.

यूपीकडून किरण नवगिरेची झुंज

निर्णायक एलिमिनेटर सामन्यात वॉरियर्सचे सर्व आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरले. एलिसा हिली 11, ताहलिया मॅकग्रा 7, श्वेता सेहरावत 1, ग्रेस हॅरिस 14 आणि दीप्ती शर्मा 16 धावाच करू शकल्या. मात्र किरण नवगिरेने आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला आशा निर्माण केल्या. पण 27 चेंडूत 43 धावा करून ती बाद झाली. या खेळीत तिने 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. नवगिरेनंतर सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टन सलग चेंडूंवर शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली.

अशा पडल्या UP च्या विकेट

पहिली: दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सायका इशाकने ऑफ स्टंपवर फुलर लेन्थ टाकला. श्वेता सेहरावत ड्राईव्ह करायला गेली पण ती कव्हर्सवर झेलबाद झाली. श्वेताने 8 चेंडूत एक धाव केली.
दुसरी: तिसर्‍या षटकाचा दुसरा चेंडू, इसाबेल वाॅंगने मधल्या स्टंपवर फुलर लेन्थ टाकला. अ‌ॅलिसा हीने तो टोलवण्याचा प्रयत्न केला पण मिडऑफला हरमनप्रीत कौरकरवी ती झेलबाद झाले. हिलीने 6 चेंडूत 11 धावा केल्या.
तिसरी: ताहलिया मॅकग्रा पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावबाद झाली. मॅकग्रा हिने 6 चेंडूत 7 धावा केल्या.
चौथी: आठव्या षटकातील पाचवा चेंडू, नताली सीव्हर ब्रंटने लेग स्टंपवर गूड लेंथ टाकला. ग्रेस हॅरिसने मोठा फटका मारला, पण लाँग ऑनवर इसाबेल वाॅंगने तिचा झेल घेतला. हॅरिसने 12 चेंडूत 14 धावा केल्या.
पाचवी: इसाबेल वाॅंगने 13व्या षटकाचा दुसरा चेंडू फूलटाॅस टाकला. किरण नवगिरेने मोठा फटका मारला, पण डीप मिड-विकेटवर नताली सीव्हरने तिचा झेल घेतला. किरण हिने 27 चेंडूत 43 धावा केल्या.
सहावी: 13व्या षटकातील तिसरा चेंडू, इसाबेल वँगने फुलर लेन्थ टाकला. सिमरन शेख तिचे खातेही उघडू शकली नाही आणि ती बोल्ड झाली.
सातवी: इसाबेल वाॅंगने 13व्या षटकाचा चौथा चेंडू फुलर लेंथ टाकला. सोफी एक्लेस्टनच्या बॅटला आतून किनार लागली आणि तीही खाते न उघडताच बोल्ड झाली.
आठवी: हॅली मॅथ्यूजने 14व्या षटकातील पाचवा चेंडू ऑफ स्टंपवर फेकला. दीप्ती शर्मा स्वीप करायला गेली, पण जिंतीमणी कलिताने शॉर्ट फाइन लेगवर उत्कृष्ट हवेत सुर पकडत झेल घेतला. दीप्तीला 20 चेंडूत केवळ 16 धावा करता आल्या.
नववी: 17व्या षटकाचा पहिला चेंडू जिंतीमणी कलिताने गुड लेंथवर टाकला. यावर अंजली सरवणी बोल्ड झाली. तिने 11 चेंडूत 5 धावा केल्या.

दहावी: 18व्या षटकाच्या चौथा चेंडू सायका इशाकाने मधल्या यष्टीवर गूड लेंथ टाकला. यावर राजेश्वरी गायकवाड एलबीडब्ल्यू झाली. तिने 9 चेंडूत 5 धावा केल्या.

मॅथ्यूज, केर यांची उपयुक्त खेळी

​​​​​​मुंबईकडून नताली सीव्हरशिवाय अमेलिया केरने 19 चेंडूत 29 धावा केल्या. हेली मॅथ्यूजने 26, यास्तिका भाटियाने 21 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 14 धावा केल्या. पूजा वस्त्राकरने 3 चेंडूत 11 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. यूपीकडून एक्लेस्टनशिवाय अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्राला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

यष्टिकाने करून दिली मुंबईला दमदार सुरूवात

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला यष्टिका भाटियाने दमदार सुरुवात केली. तिने सुरुवातीपासूनच आपले फटके खेळले, पण पाचव्या षटकात अंजली सरवानीने तिचा झेल घेतला. त्याने 18 चेंडूत 21 धावा केल्या. पॉवरप्लेच्या 6 षटकांत मुंबईने एक गडी गमावून 46 धावा केल्या.

अशा पडल्या मुंबईच्या विकेट

पहिली: पाचव्या षटकाचा दुसरा चेंडू, अंजली सरवानीने ऑफ स्टंपवर गूड लेंथ टाकला. यास्तिका भाटियाने लाँग ऑनच्या दिशेने शॉट खेळला, पण मिडऑफला किरण नवगिरेने तिचा झेल घेतला. यस्तिकाने 18 चेंडूत 21 धावा केल्या.

दुसरी: पार्श्वी चोप्राने 10व्या षटकाचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेली मॅथ्यूजला किरण नवगिरेने लाँग ऑनवर झेलबाद केले. तिने 26 चेंडूत 26 धावा केल्या.
तिसरी: 13व्या षटकातील पाचवा चेंडू सोफी एक्लेस्टोनने फुलर लेन्थ टाकला. हरमनप्रीत कौर शॉट खेळण्यासाठी पुढे गेली, पण बोल्ड झाली. हरमनने 15 चेंडूत 14 धावा केल्या.
चौथी: 19व्या षटकाचा शेवटचा चेंडू, सोफी एक्लेस्टोनने फुलर लेन्थ टाकला. अमेलिया केरने स्वीप केला, पण स्क्वेअर लेगवर अंजली सरवाणीने त्याचा झेल घेतला.

आता एलिमिनेटर जिंकणारा संघ 26 मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध अंतिम सामना खेळेल. पुढील स्टोरीत, आपण स्पर्धेतील दोन्ही संघांचा प्रवास, त्यांचा उत्कृष्ट कामगिरी करणारा, स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणारा, खेळपट्टीचा अहवाल आणि संभाव्य प्लेइंग-11 जाणून घेऊ.

मुंबईने जिंकले पहिले 5 सामने

मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सविरुद्ध 143 धावांनी विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. यानंतर संघाने सलग 4 सामने जिंकले. संघाचा विजय रथ यूपी वॉरियर्सने रोखला. 18 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यूपीने 5 गडी राखून विजय मिळवला. यानंतर दिल्लीनेही मुंबईचा 9 विकेट्सने पराभव केला.

लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत 12 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.

यूपीने शेवटच्या 3 पैकी जिंकले 2 सामने

यूपी वॉरियर्सने गुजरातविरुद्ध 3 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेत पदार्पण केले. मात्र दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ 42 धावांनी पराभूत झाला. यूपीने बेंगळुरूविरुद्धचा तिसरा सामना जिंकला, पण चौथा आणि पाचवा सामना गमावला.

संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी शेवटच्या 3 पैकी 2 सामने जिंकणे आवश्यक होते. संघाने गुजरात आणि मुंबईवर सलग सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मात्र, साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध संघाला 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

आतापर्यंचे सामने बरोबरीत

WPL च्या लीग टप्प्यात दोन्ही संघ आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. 12 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना यूपीने 6 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 17.3 षटकांत 2 गडी गमावून सामना जिंकला. दोन्ही संघ 18 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर भिडले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव 127 धावांवर आटोपला. यूपीने 19.3 षटकात 5 विकेट्स राखून सामना जिंकला.

दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकला. दोघांनी लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला. अशा स्थितीत डी.वाय.पाटील स्टेडियमवर पुन्हा एकदा दोघांमध्ये होणारा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

खेळपट्टीचा अहवाल

सुरुवातीला ब्रेबॉर्न स्टेडियमच्या खेळपट्टीवर खूप धावा होत होत्या, पण नंतर येथे फिरकीला मदत मिळू लागली आणि धावाही कमी झाल्या. खेळपट्टीवर फिरकीला मदत होईल अशी अपेक्षा आहे. येथील सरासरी धावसंख्याही 130 धावांची आहे. दोन्ही संघांनी पाठलाग करताना एकमेकांविरुद्धचे मागील सामने जिंकले होते, अशा स्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे संघांना आवडेल.

हवामान स्थिती

गेल्या काही दिवसांपासून देशभरात पाऊस पडत होता, मात्र आता वातावरण पूर्णपणे स्वच्छ झाले आहे. शुक्रवारी नवी मुंबईत पाऊस पडणार नाही. रात्रीचे तापमान 28 ते 31 अंशांच्या दरम्यान राहील.

आता या स्पर्धेतील अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर एक नजर...

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर (सी), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सायव्हर ब्रंट, अमेलिया केर, इसाबेल वोंग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता आणि सायका इशाक.

यूपी वॉरियर्स: एलिसा हिली (यष्टीरक्षक आणि कर्णधार), श्वेता सेहरावत, देविका वैद्य, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टन, दीप्ती शर्मा, अंजली सरवानी आणि राजेश्वरी गायकवाड