आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Mumbai Semifinals With World Record 725 run Victory; Record Break Of 92 Years, Uttarakhand Defeat Uttar Pradesh Challenge Mumbai In The Semi finals

रणजी ट्रॉफी:विश्वविक्रमी 725 धावांच्या विजयासह मुंबई उपांत्य फेरीत; 92 वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक, उत्तराखंडचा पराभव

अल्लूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदार्पणात सुवेद पारकर सामनावीरचा मानकरी
सामनावीर सुवेद पारकरने (२५२) झंझावाती द्विशतक आणि धवल कुलकर्णी (३/११), शम्स मुलाणी (३/१५) आणि तनुष काेटीने (३/१३) शानदार गाेलंदाजीने मुंबई संघाला गुरुवारी रणजी ट्राॅफीमध्ये विश्वविक्रमी विजय मिळवून दिला. ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाने रणजी ट्राॅफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दुबळ्या उत्तराखंडवर दणदणीत विजयाची नाेंद केली. मुंबई संघाने ७२५ धावांनी सामना जिंकला. विजयाच्या खडतर ७९५ धावांच्या प्रत्युत्तरात उत्तराखंड टीमचा अवघ्या ६९ धावांत खुर्दा उडाला. संघाकडून शिवमने नाबाद २५ आणि कुणालने २१ धावांची खेळी केली. इतर फलंदाज एकेरी धावात बाद झाले. मुंबई संघाने ८ बाद ६४७ धावांवर आपला पहिला डाव घाेषित केला. त्यानंतर ३ बाद २६१ धावांवर दुसरा डाव घाेषित करून माेठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरात उत्तराखंड टीमने ११४ धावांवर पहिला आणि ६९ धावांवर दुसरा डाव गुंडाळावा लागला. मुंबई संघाकडून पदार्पणात द्विशतक साजरा करणारा सुदेव पारकर (२५२) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

यासह मुंबई संघाने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नाेंद केली. यापूर्वी १९३० मध्ये आॅस्ट्रेलियन टीम न्यू साऊथ वेल्सने विक्रमी विजयाची नाेंद हाेती. या संघाने शेफील्ड शील्डमध्ये क्वीन्सलँडचा ६८५ धावांनी पराभव केल हाेता. त्यानंतर आता मुंबई संघाला या ९२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला ब्रेक करता आले. या विश्वविक्रमी विजयासह मुंबई संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आता मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात उपांत्य सामना रंगणार आहे. मुंबई संघाने तिसऱ्या दिवशी ३ बाद २६१ धावांवर आपला दुसरा डाव घाेषित केला. यातून मुंबईने उत्तराखंडसमाेर ७९५ धावांचे टार्गेट ठेवले. प्रत्तुत्यरात उत्तराखंड टीमला गुरुवारी दुसऱ्या डावात ६९ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला.

धावांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रमी विजय
रन संघ प्रतिस्पर्धी वर्ष
725 मुंबई उत्तराखंड 2022
685 न्यू साऊथवेल्स क्वीन्सलँड 1930
675 इंग्लंड ऑस्ट्रेलिया 1928
638 न्यू साऊथवेल्स साऊथ ऑस्ट्रेलिया 1921
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश उपांत्य फेरीत

बातम्या आणखी आहेत...