आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी ट्रॉफीची फायनल:मध्य प्रदेशसमोर आज मुंबईचे आव्हान; प्रक्षेपण स. 9.00 वाजेपासून

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फलंदाजी : मुंबई संघ फलंदाजीमध्ये अधिक तरबेज आहे. पृथ्वी शॉ, यशस्वी जायस्वाल, अरमान जाफर, सरफराज खान सारखे सर्वोत्तम फलंदाज संघात आहेत. याशिवाय पदार्पणात द्विशतक साजरे करणारा सुवेद पारकरही फायनलमध्ये मोठ्या खेळीसाठी सक्षम मानला जातो. त्यामुळे संघाची बाजू अधिक मजबूत आहे.

गोलंदाजी : मुंबई संघ यंदा गोलंदाजीमध्ये काही प्रमाणात यशस्वी ठरला आहे. धवल कुलकर्णी आपल्या आक्रमणात सातत्य ठेवत बळी घेत आहे. इतर गोलंदाजांना कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. तुषार देशपांडेसारख्या गाेलंदाजांना स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.

नेतृत्व : पृथ्वी शॉच्या नेतृत्वावर सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. फलंदाजीसह तो कुशल नेतृत्वातून उल्लेखनीय यश संपादन करत आहे. किताब जिंकून तो कुशल नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मुंबई : गोलंदाजीचा सामना करणारे सर्वोत्तम फलंदाज; कर्णधार पृथ्वीला सर्वोत्तम खेळीतून सिद्ध करावे लागणार

मध्य प्रदेश : युवा फलंदाज रजत पाटीदारवर मदार; गोलंदाज कुमार कार्तिकेय सर्वात मोठा विकेट टेकर